sanjay gandhi national park

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान(Sanjay Gandhi National Park) परिसरातील चार किलोमीटरपर्यंतच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांचे (Eco Sensitive Zone)मॅपिंग केले जाणार आहे.

    मुंबई: बोरीवली(Borivali) येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान(Sanjay Gandhi National Park) परिसरातील चार किलोमीटरपर्यंतच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांचे (Eco Sensitive Zone)मॅपिंग केले जाणार आहे. मुंबई महापालिका(BMC) याचे डिजिटल नकाशे(Digital Map) तयार करून या संवेदनशील क्षेत्राचा झोनल मास्टर प्लान बनवणार आहे. या कामामुळे आरे वसाहतीतील(Aarey Colony Metro Carshade) वादग्रस्त मेट्रो कारशेडला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

    राष्ट्रीय उद्यानाच्या सभोवतालचा चार किलोमीटरपर्यंतचा परिसर केंद्र सरकारने पर्यावरण संवेदशनशील म्हणून जाहीर आहे. केंद्र सरकारने २०१६ मध्ये अधिसुचना प्रसिद्ध केली होती. या अधिसूचनेनुसार या परिसरातील क्षेत्रीय आराखडा तयार केला जाणार आहे. या संरक्षण क्षेत्राच्या नियंत्रण समितीचे प्रमुख महानगर पालिका आयुक्तांची नियुक्ती राज्य सरकारने मार्च २०२१ मध्ये केली. त्यानुसार आता पालिकेने या परिसराचे डिजिटल मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. संवेदनशील क्षेत्राचे डिजीटल सिमांकन करण्यात येणार आहे. त्यासाठी हवाई छायाचित्रीकरणही करण्यात येईल. विविध बाबींचा अभ्यास केला जाणार असून पालिका या क्षेत्राचा झोनल मास्टर प्लान बनवणार आहे.

    महापालिकेने हा मास्टर प्लान तयार करण्यासाठी खासगी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिका ३ कोटी ४६ लाख रुपयांचा खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

    हा आराखडा येथील पाणी पुनर्संचयीत करणे, विद्यमान पाण्याचे संवर्धन करणे, पाणलोट व्यवस्थापन, स्थानिक नागरिकांच्या गरजांची सांगड घालून तयार करण्यात येईल. विद्यमान जमीन वापर, जैव विविधता, भू नकाशे, पर्यावरण संवेदशिल आणि विकास आराखड्यांचे सिमांकन करण्यात येईल. पर्यावरण पुरक आराखड्याला प्राधान्य दिले जाणार आहे.