कचऱ्याची विल्हेवाट लावणार कशी? BMC घेणार मुंबईकरांची मदत

मुंबई शहरात दररोज सुमारे ६५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. या कच-यामध्ये सुका कचरा, ओला कचरा, घरगुती घातक कच-याचा समावेश होतो. कच-यामध्ये घट, कच-यावर स्रोताच्या ठिकाणी प्रक्रिया करणे या मार्गाने स्वच्छतेच्या बाबतीत सुधारणा होऊ शकते. यासाठी ‘व्हिजन २०३०’ तयार करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. याबाबत मुंबईकरांची मते जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण केले जात आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

    मुंबई : शहराला शून्य कचरा व्यवस्थापनाकडे नेण्यासाठी मुंबई महापालिकेने ऑनलाइन सर्वेक्षण सुरू केले आहे. कचरा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी ‘व्हिजन २०३०’ हा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांच्या विविध सामाजिक-आर्थिक रचनेला समजावून घेऊन या उपक्रमाअंतर्गत ऑनलाइन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

    मुंबई शहरात दररोज सुमारे ६५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. या कच-यामध्ये सुका कचरा, ओला कचरा, घरगुती घातक कच-याचा समावेश होतो. कच-यामध्ये घट, कच-यावर स्रोताच्या ठिकाणी प्रक्रिया करणे या मार्गाने स्वच्छतेच्या बाबतीत सुधारणा होऊ शकते. यासाठी ‘व्हिजन २०३०’ तयार करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. याबाबत मुंबईकरांची मते जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण केले जात आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

    भविष्यातील गरजांच्या दृष्टीकोनातून कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी पालिका आपल्या साधनांचा व उपलब्ध जागेचा अधिकाधिक परिणामकारक वापर करू इच्छिते. यादृष्टीने हे सर्वेक्षण आवश्यक आहे. ऑनलाइन सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी “https://mcgm-citizen-survey.cloudstrats.com” या संकेतस्थळावरील प्रश्नांची उत्तरे देऊन सर्वेक्षणामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.