bmc

नव्या आर्थिक वर्षात नागरी वनसंवर्धन उपक्रम पालिका हाती घेणार आहे. शहरी वनीकरण, वृक्ष संरक्षण आणि संवर्धनावर भर दिला जाईल. सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात पालिकेने यासाठी ४०२ कोटींची तरतूद(bmc budget) केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ८० कोटी १४५ लाखाची वाढ दर्शवली आहे. अर्थसंकल्पाला वृक्ष प्राधिकरणाने आज मंजूरी दिली.

मुंबई: मुंबईतील विविध प्रकल्पांच्या कामांमध्ये बाधित होणाऱ्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पालिकेला जाग आली आहे. नव्या आर्थिक वर्षात नागरी वनसंवर्धन उपक्रम पालिका हाती घेणार आहे. शहरी वनीकरण(forestation), वृक्ष संरक्षण(forest conservation) आणि संवर्धनावर भर दिला जाईल. सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात पालिकेने यासाठी ४०२ कोटींची तरतूद(bmc budget) केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ८० कोटी १४५ लाखाची वाढ दर्शवली आहे. अर्थसंकल्पाला वृक्ष प्राधिकरणाने आज मंजूरी दिली.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संवर्धन अधिनियम १९७५ च्या प्रकरण सहाच्या कलम १६ अन्वये प्रत्येक महापालिकेने वृक्ष प्राधिकरणाचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर केला जातो. शहरात गगनचुंबी इमारती उभ्या राहू नयेत. वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी, हा यामागचा उद्देश असतो. मागील वर्षी वृक्ष प्राधिकरण विभागासाठी सन २०२०- २१ करिता ३९३,३३,४१,००० इतका सुधारित अर्थसंकल्प सादर केला होता. आगामी वर्ष २०२१- २२ करिता ४०२३४८६ इतका अंदाजित अर्थसंकल्प सादर केला आहे. सन २०२०-२१ मध्ये एकूण महसूल उत्पन्न ११३३५६५ इतका होता. नव्या आर्थिक वर्षात हेच उत्पन्न १२९४५०७ इतका म्हणजेच १६०९४२ कोटी इतका अंदाजित आहे. तर २०२०-२१ मध्ये भांडवली उत्पन्नात ११५०० रुपयांची तूट होती. सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात २३००० रुपयांची तूट दर्शवली आहे. गेल्या वर्षी ११५०० नागरी वनसंवर्धनाचे धोरण होते. आगामी वर्षात २३००० नागरी वनसंवर्धनाचे पालिकेचे उद्दिष्ट्य आहे. तर उद्यानातील वृक्षांचे संरक्षण आणि जतनासाठी उद्यान खात्याकरिता ३० कोटींची अर्थसंकल्पात अंदाजित तरतूद केल्याचे वृक्ष प्राधिकरणाने म्हटले आहे.

अंदाजित अर्थसंकल्पाला वृक्ष प्राधिकरण समितीने मंजूरी दिली आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतर पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे.

अशी आहे आर्थिक तरतूद
वृक्ष प्राधिकरण – १४ कोटी
पालिका आयुक्तांचे कार्यालय – ४१ कोटी
सुरक्षा – ३३ कोटी
विधी – ५ कोटी
वित्त, कोषागार आणि लेखा – २३ कोटी
वैधानिक परिक्षा – ११ कोटी
शहरी वनीकरण – ३०० कोटी
वृक्षांचे संरक्षण – ६११ कोटी
वृक्षांचे परिरक्षण – १०१७ कोटी
नवीन वृक्षांची लागवड – ५२कोटी
रोपवाटीकेचा विकास – २१८ कोटी
प्रसिध्दी व उद्यानविषयक प्रदर्शन – ११७ कोटी
अस्तित्वात असलेल्या वृक्षांची गणना – १३ कोटी
क्षेपणभूमीतील वृक्षांची देखभाल व नवीन वृक्षांची लागवड ४०५ कोटी
मालमत्ता कर – ३९६ कोटी