ओला, सुका कचरा जमा करण्यासाठीच्या डब्यांसाठी मुंबई पालिका देणार १ कोटी ८१ लाख, स्थायी समिती अध्यक्षांच्या निर्देशानंतर घेण्यात आला निर्णय

कचरा डब्यांचा पुरवठा(Supply Of Dustbin) करण्यासाठी पालिकेने टेंडर(Tender) काढले होते. त्याला तीन कंत्राटदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र सर्वात कमी दरात म्हणजे प्रति कचरा डबा १ हजार ८१६ रुपये प्रमाणे १० हजार कचरा डबे १ कोटी ८१ लाख ६० हजार रुपये एवढ्या किमतीत कंत्राटदार पुरवठा करणार आहे.

    मुंबई: महापालिकेच्या भायखळा(Bhaykhala), माझगाव(mazgav) परिसरातील नागरिकांना घरोघरी ओला व सुका कचरा(Wastage) वेगवेगळा जमा करण्यासाठी आणि त्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी २२ लिटर क्षमतेचे ( ११ लिटर ओला कचरा व ११ लिटर सुका कचरा) १० हजार डबे खरेदी(Dustbin Purchase) करण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबई पालिका कंत्राटदार मे. पंचरत्न प्लास्टिक या कंत्राटदाराला १ कोटी ८१ लाख ६० हजार रुपये अदा करणार आहे.स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव(yashwant Jadhav) यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

    कचरा डब्यांचा पुरवठा करण्यासाठी पालिकेने टेंडर काढले होते. त्याला तीन कंत्राटदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र सर्वात कमी दरात म्हणजे प्रति कचरा डबा १ हजार ८१६ रुपये प्रमाणे १० हजार कचरा डबे १ कोटी ८१ लाख ६० हजार रुपये एवढ्या किमतीत कंत्राटदार पुरवठा करणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर केल्यानंतर त्याबाबतचे कार्यदेश कंत्राटदाराला प्राप्त झाल्यावर पुढील ४५ दिवसांत या कचरा डब्यांचा पुरवठा करणे बंधनकारक होणार आहे.