तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नियमांची कडक अंंमलबजावणी करण्याचे आयुक्तांचे निर्देश, सील केलेल्या इमारतीत No Entry

मुंबईतील (Mumbai) इमारतीमध्ये ५ किंवा ५ पेक्षा अधिक कोविडबाधित रुग्ण आढळून आल्यास अशी इमारत ‘सील’ करण्यात येते. या नियमाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व अधिक कठोरपणे करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त चहल(Chahal) यांनी दिले आहेत.

    मुंबई: मुंबईतील(Mumbai) ज्या इमारतींमध्ये पाच किंवा पाचपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण(Corona Patients ) आढळतील अशी इमारत ‘सील’ (Building Sealing) करण्यात येते. तिसऱ्या लाटेच्या(Thirrd Wave) पार्श्वभूमीवर या नियमाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे आणि अधिक कठोरपणे करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल(Order By Iqbalsingh Chahal) यांनी दिले आहेत.

    पालिका आयुक्त चहल यांच्या मार्गदर्शनात पालिका क्षेत्रातील कोरोना आणि आरोग्य विषयक आढावा बैठक काल पालिका मुख्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्यासह संबंधीत सह आयुक्त, उप आयुक्त, मुंबई पोलीस उप आयुक्त पालिकेचे सहाय्यक आयुक्त, संबंधीत खाते प्रमुख, विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते.

    गेल्या काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. आता तिसऱ्या लाटेची भीती असल्याने कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत अत्यंत सजग व सतर्क राहून अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यानुसार आधीपासूनच लागू असलेल्या नियमानुसार इमारतीमध्ये ५ किंवा ५ पेक्षा अधिक कोविडबाधित रुग्ण आढळून आल्यास अशी इमारत ‘सील’ करण्यात येते. या नियमाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व अधिक कठोरपणे करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त चहल यांनी दिले आहेत.

    सील इमारतीत नो एन्ट्री
    ज्या इमारती सील करण्यात येतील, अशा इमारतींमध्ये प्रवेश करण्यास कोणालाही अनुमती असणार नाही. तसेच इमारतींमध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तिला बाहेर पडण्यास मनाई असणार आहे. त्याचबरोबर अशा इमारतींमध्ये विविध कामांसाठी येणारे कामगार, वाहन चालक यांना देखील सदर कालावधी दरम्यान इमारतीमध्ये प्रवेश असणार नाही. सर्व सील इमारतींच्या गेटवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. आरोग्य खातेही सज्ज झाले आहे.

    साथीच्या रोगांवर नियंत्रण
    तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन खबरदारीची उपाययोजना म्हणून आणि कोविड या साथरोगाचा संसर्ग इतरांना होऊ नये, या उद्देशाने प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे करण्यात येत आहेत.

    मास्कसाठी सक्ती
    मास्क परिधान न करता नागरिक आढळून येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच अनेक सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर राखले जात नसल्याच्या तक्रारी देखील प्राप्त होत आहेत. याबाबत योग्य ती खबरदारी न घेतल्यास पुन्हा एकदा आपल्याला निर्बंध अधिक कडक लागू शकतात. त्यामुळे नियमांच्या उल्‍लंघनाबाबत अधिक व्यापकतेने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. क्लीन-अप मार्शल’ ची तात्पुरती नियुक्ती २४ विभागात केली आहे. मुंबई पोलीसांद्वारे करण्यात येत असलेली ‘विना मास्क’ विषयक कारवाई देखील अधिक तीव्र करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी मुंबई पोलीस दलास दिल्या आहेत.

    २६६ चाचणी केंद्रे सुरू
    कोविड बाधा झाल्याची चाचणी २६६ कोविड चाचणी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. तरी ज्यांना कोविडची लक्षणे असतील, त्यांनी कोविड चाचणी केंद्रात जाऊन कोविड चाचणी करुन घ्यावी. तसेच सील इमारतींमधील व्यक्तिंची देखील टप्प्या-टप्प्याने कोविड चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. कोविड चाचणी केंद्राची माहिती वॉर्ड वॉर रुमद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) अद्ययावत करण्याचे निर्देशही दिले आहेत.

    निर्जंतुकीकरण
    महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून ५ वेळा निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्याचे निर्देश. तसेच याच पद्धतीने महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये असणाऱ्या शौचालयांचे देखील निर्जंतुकीकरण नियमितपणे करण्याचे निर्देश दिले आहेत.

    २६ टक्क्यांचे लक्ष
    मुंबईतील १८ वर्षे व अधिक वय असणाऱ्या सुमारे ७४ टक्के नागरिकांचे एक लसीकरण झालेले आहे. पालिका आयुक्तांनी उर्वरित २६ टक्के नागरिकांचे लसीकरण व्हावे, या दृष्टीने सर्वस्तरीय प्रयत्न करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत.