प्रहारच्या आंदोलनाच्या इशाऱ्या नंतर मुंबई महानगर पालिकेला आली जाग; पत्नीच्या नावे कंत्राट घेणाऱ्या कर्मचाऱ्याची केली बदली, खात्यांतर्गत चौकशी सुरु

मुंबई महानगर पालिका कायदा १८८८ कलम ८६(१) नुसार मुंबई महानगर पालिकेतील कर्मचारी किवा पत्नी कोणतेही कंत्राट घेऊ शकत नाहीत, असे असताना महागर पालिकेची फासवणूक करून कंत्राट घेणाऱ्या कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे व त्यांचे कंत्राट रद्द करण्यात यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष मुंबई संपर्क प्रमुख ॲड. अजय तापकीर यांनी महानगर पालिका आयुक्त यांच्या कडे केली होती.

    मुंबई : पत्नीच्या नावे मुंबई महानगर पालिकेचे रु. १कोटी ११ लाख चे कंत्राट घेणाऱ्या कर्मचाऱ्याची करण्यात बदली आली असून त्याची खात्यांतर्गत चौकशी सुरु करण्यात आली आहे. अर्जुन नराळे हे मुंबई महानगर पालिकेच्या डी वार्ड मध्ये कर्मचारी आहेत, त्यांची पत्नी अर्पणा अर्जुन नराळे यांच्या नावे असलेल्या Shree Enterprises ला रु १कोटी ११ लाखांचे कोविड संलग्न कामाचे कंत्राट देण्यात आले आहे.

    मुंबई महानगर पालिका कायदा १८८८ कलम ८६(१) नुसार मुंबई महानगर पालिकेतील कर्मचारी किवा पत्नी कोणतेही कंत्राट घेऊ शकत नाहीत, असे असताना महागर पालिकेची फासवणूक करून कंत्राट घेणाऱ्या कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे व त्यांचे कंत्राट रद्द करण्यात यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष मुंबई संपर्क प्रमुख ॲड. अजय तापकीर यांनी महानगर पालिका आयुक्त यांच्या कडे केली होती. यावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला होता त्याननंतर आयुक्त यांच्या आदेशाने अर्जुन नारळे यांची बदली करण्यात आली असून त्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरु करण्यात आली आहे.