BMC चा १०२ टक्के नालेसफाईचा दावा खोटा; काँग्रेसची टीका

मुंबई महानगरपालिकेकडून शहर विभागात १०२ टक्के नाले सफाईझाल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा खोटा असल्याची टीका काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटले आहे. पालिकेतील विरोधी पक्ष नेत्यांसमवेत त्यांनी आज धारावीसह पूर्व उपनगरातील नालेसफाईची पाहणी केली. त्यानंतर एका पत्रकार परिषदेत नालेसफाईच्या प्रशासनाच्या दाव्याचा पाेलखाेल केला.

    मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून शहर विभागात १०२ टक्के नाले सफाईझाल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा खोटा असल्याची टीका काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटले आहे. पालिकेतील विरोधी पक्ष नेत्यांसमवेत त्यांनी आज धारावीसह पूर्व उपनगरातील नालेसफाईची पाहणी केली. त्यानंतर एका पत्रकार परिषदेत नालेसफाईच्या प्रशासनाच्या दाव्याचा पाेलखाेल केला.

    मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यादरम्यान व पावसाळ्यानंतर नालेसफाई केली जाते. पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून मुंबईची तुंबई होत असल्याने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईवर विशेष भर पालिकेकडून दिला जातो. मागीलवर्षीही कोरोनाच्या काळात नालेसफाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मात्र त्यानंतरही मुंबई तुंबली होती. यंदाही कोरोनाची दुसरी लाट असताना पालिकेने नाले सफाईचा दावा केला आहे. मुंबईमध्ये एकूण सरासरी ९८ टक्के तर शहर विभागात १०२ टक्के नालेसफाईचा दावा महापालिकेने केला आहे.

    मुंबई महापालिकेने केलेल्या या दाव्याची शहनिशा करण्यासाठी पालिकेतील विरोधी पक्ष आसलेल्या काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच्या उपस्थितीत भाई जगताप यांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. गोवंडी, चेंबूर, सायन आदी विभागात नाल्याची पाहणी केली. त्याठिकाणी पालिकेने नालेसफाईचा जितका दावा केला तितकी नालेसफाई झाली नसल्याचे जगताप यांनी सांगितले.

    मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार काही प्रमाणात कमी झाला आहे. हा प्रसार कमी होत असताना नालेसफाई झाली नसल्याने अस्वच्छतेमुळे नागरिकांना त्याचा त्रास होऊ शकतो. धारावी मॉडेलचे सर्वत्र नाव होत आहे. मात्र धारावीतील नाल्यात कचरा आहे. यावरून नालेसफाई झाली नसल्याचे दिसते. आम्ही पालिकेत विरोधी पक्षात आहोत, नागरिकांना चांगली सेवा मिळावी यासाठी आम्ही स्थायी समिती आणि सभागृहात आवाज उचलत राहू असे जगताप म्हणाले.