खड्डे नकोयत? मग खड्ड्याचे फोटो पाठवा, २४ तास थांबा आणि पाहा, बीएमसीचा नवा उपक्रम

पावसाळ्यात शहरात जागोजागी खड्डे पडतात. अनेकदा तक्रारी करूनही खड्डे बुजवले जात नाहीत. शिवाय एखादा खड्डा बुजवला तरी पुन्हा काही दिवसांनी तिथं खड्डा तयार होतो. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेनं एक योजना आखलीय. या योजनेनुसार नागरिक त्यांच्या परिसरातील खड्ड्याचा फोटो अपलोड करू शकतात. फोटो अपलोड केल्यानंतर केवळ २४ तासांत हा खड्डा बुजवला जाणार आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी ही माहिती दिलीय. 

    मुंबई आणि खड्डे हे समीकरण दर पावसाळ्यात डोकं वर काढत असतं. सध्या कोरोनाच्या लाटेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबई महापालिकेनं यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांची खड्ड्यांच्या त्रासातून सुटका व्हावी, यासाठी अनोखा उपाय केलाय. यासाठी नागरिकांना आता केवळ खड्ड्यांचा फोटो काढून तो अपलोड करावा लागणार आहे.

    पावसाळ्यात शहरात जागोजागी खड्डे पडतात. अनेकदा तक्रारी करूनही खड्डे बुजवले जात नाहीत. शिवाय एखादा खड्डा बुजवला तरी पुन्हा काही दिवसांनी तिथं खड्डा तयार होतो. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेनं एक योजना आखलीय. या योजनेनुसार नागरिक त्यांच्या परिसरातील खड्ड्याचा फोटो अपलोड करू शकतात. फोटो अपलोड केल्यानंतर केवळ २४ तासांत हा खड्डा बुजवला जाणार आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी ही माहिती दिलीय.

    आपल्या विभागातील खड्डे नागरिक बीएमसीच्या व्हॉट्सअपवर किंवा मायबीएमसी या वेबसाईटवर अपलोड करू शकतील. त्यानंतर २४ तासाच्या आत हा खड्डा बुजवला जाईल. मुंबईतील सर्व २४ वॉर्डमध्ये कंत्राटदारांच्या मदतीने या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झालीय.

    पाऊस सुरू असतानादेखील खड्डे बुजवणं आता शक्य होणार आहे. कोल्डमिक्सच्या मदतीनं हे खड्डे बुजवणं शक्य होणार आहे. यासाठी आतापर्यंत ६३० मेट्रिक टनपेक्षा जास्त कोल्डमिक्सचं उत्पादनही तयार करण्यात आलंय. २७० टन कोल्डमिक्स २४ वॉर्डांमध्ये वितरितही करण्यात आलंय.