Boats wrecked by hurricane; Loss of fishermen in Madh, Marve

दोन दिवसांपूर्वी आलेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईत सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस झाला. समुद्र खवाळलेला होता. त्यामुळे नांगर टाकून ठेवलेल्या बोटी देखी दोर तोडून समुद्रात अनियंत्रित झाल्या. त्यामुळे मच्छिमार बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उत्तर मुंबईतील मढ, मार्वे परिसरातील कोळीवाड्यांतील मच्छिमार बांधवांच्या बोटींचे तुकडे-तुकडे झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून मच्छिमार बांधवांना भरपाई द्यावी, अशी सूचना खासदार गाेपाळ शेट्टी यांनी मत्स्यव्यवसाय व महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.

    मुंबई : दोन दिवसांपूर्वी आलेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईत सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस झाला. समुद्र खवाळलेला होता. त्यामुळे नांगर टाकून ठेवलेल्या बोटी देखी दोर तोडून समुद्रात अनियंत्रित झाल्या. त्यामुळे मच्छिमार बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उत्तर मुंबईतील मढ, मार्वे परिसरातील कोळीवाड्यांतील मच्छिमार बांधवांच्या बोटींचे तुकडे-तुकडे झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून मच्छिमार बांधवांना भरपाई द्यावी, अशी सूचना खासदार गाेपाळ शेट्टी यांनी मत्स्यव्यवसाय व महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.

    चक्रवादळामुळे उत्तर मुंबईतील मढ, मार्वे परिसरातील कोळीवाडा समाजातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हे पाहता उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी महसुल व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत नुकसानग्रस्त झालेल्या परिसराची पाहणी केली आणि वादळामुळे बाधित झालेल्या मच्छिमार बांधवांशी चर्चा केली. यावेळी खासदार शेट्टी यांनी मच्छिमारांच्या झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून तातडीने मदत उपलब्ध करून द्या, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी मुंबईत भाजप सचिव विनोद शेलार, जिल्हा अध्यक्ष युनुस खान, मालाड मंडळाचे अध्यक्ष सुनील कोळी आदी उपस्थित होते.

    मासेमारी बांधवांना मदत द्या

    तौक्ते चक्रीवादळामुळे मच्छिमार आणि पीडित लोकांना राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केली. वादळामुळे मच्छिमार तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई वआसपासच्या भागातील सामान्य नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. मुसळधार पाऊस पडत होता आणि वादळामुळे होणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांचे बरेच नुकसान झाले आहे.

    बोटी वाहून गेल्या, घर उडाले, भिंती कोसळल्या

    समुद्रामध्ये वेगाने वाढणाऱ्या लाटांमुळे तेथील रहिवासी मच्छिमारांना खूप त्रास सहन करावा लागला जोरदार वाऱ्यामुळे त्यांच्या बोटी देखील वाहून गेल्या, घर उडाले, भिंती कोसळल्या, त्याचप्रमाणे मुंबई व आसपासच्या परिसरात जोरदार वारा आणि पावसामुळे बरीच झाडे कोसळली, त्यामुळे वाहनांसह इतरही अनेक वस्तूंचे नुकसान झाले, अनेक दुकानदारांच्या दुकानाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

    कुलाब्यात अरविंद सावंत यांनी केली पाहणी

    चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या अनेकांचे नुकसान झाले. यामध्ये अनेक मंदिर व घरावर झाडे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे दक्षिण मुंबई खासदार अरविंद सावंत यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व कुलाबा विभागातील नुकसान झालेल्या ठिकाणची पाहणी करून पंचनामा करण्याची मागणी केली. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कुलाब्यातील नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कुलाबा विधानसभामध्ये कुलाबा विभागातील दत्तमंदिर, ठाकुरद्वार परिसरात भेट देऊन वादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला व चाळींमध्ये फिरुन पाहणी केली. यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी नागरिकांना शिवसेना खंबीरपणेसोबत असल्याबद्दल आश्वासन दिले.