sion hospital death body exchange

वडाळा येथे राहत असलेल्या अंकुश सर्वदे (२८) हा युवक मागील आठवड्यात रस्ता अपघातात जखमी झाला, उपचारासाठी त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याची प्रकृती ठीक होती, परंतु रविवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मॄत्यु झाला.

मुंबई: पालिकेच्या सायन रुग्णालयात (Sion hospital) मृतदेह अदलाबदली (Body exchange) झाल्याची घटना रविवारी घडली. या घटनेनंतर पुन्हा एकदा पालिका रुग्णालयातील भोंगळ कारभार  ( management) चव्हाट्यावर आला आहे. याबाबत पीडीत नातेवाईकांनी रविवारी रात्री उशीरा सायन रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात सायन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

वडाळा येथे राहत असलेल्या अंकुश सर्वदे (२८) हा युवक मागील आठवड्यात रस्ता अपघातात जखमी झाला, उपचारासाठी त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याची प्रकृती ठीक होती, परंतु रविवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मॄत्यु झाला.

याबाबत रुग्णालय प्रशासनाने आम्हाला फोन करुन कळविले, असे मॄतकची बहिण जयश्री सर्वदे सांगतात, आम्ही काही नातेवाइकासह मॄतदेह घेण्यास गेलो असता, मॄतदेह दुसऱ्या व्यक्तिचा होता, “”हा मॄतदेह माझ्या भावाचा नाहिये, अस मी तेथील कर्मचाऱ्याना सांगितले, असे जयश्री सांगत होत्या, बऱ्याच वेळा नंतर मृतदेह अदलाबदली झाल्याचे कर्मचाऱ्यानी सांगितले. तुमच्या भावाचा मृतदेह अन्य परिवाराला चुकीने देण्यात आला व त्यांनी त्यावर अंत्यसंस्कार ही केले असल्याचे जयश्री सर्वदे यांनी सांगितले.

दरम्यान या घटनेनतर पीडीत कुटुंबीय आणि नातेवाईकानी रविवारी रुग्णालय परिसरात गोंधळ घातला व प्रशासनाला धारेवर धरले, तर रात्रि उशीरा नातेवाइकानी सायन पोलिस ठाण्यात रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तक्रार दाखल केली. याबाबत सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की, या प्रकाराबाबत मला माहित नाही.