रेमडेसिवीर विक्रीच्या बोगस जाहिराती; सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

कोरोना बाधितांच्या उपचारासाठी संजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिवीर व टॉसिलीझुमॅब या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने काळाबाजाराला उधाण आले आहे. विविध मार्गांनी या इंजेक्शनचा काळाबाजार होत असताना आता भामट्यांनी सोशल मीडियावर सिप्ला फार्मा कंपनीच्या नावाने रेमडेसिवीर व टॉसिलीझुमॅब विक्रीच्या बोगस जाहिराती व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. सदर बाब लक्षात येताच मुंबई पोलीस दलाच्या सायब गुन्हे नियंत्रण कक्षाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

    मुंबई : कोरोना बाधितांच्या उपचारासाठी संजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिवीर व टॉसिलीझुमॅब या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने काळाबाजाराला उधाण आले आहे. विविध मार्गांनी या इंजेक्शनचा काळाबाजार होत असताना आता भामट्यांनी सोशल मीडियावर सिप्ला फार्मा कंपनीच्या नावाने रेमडेसिवीर व टॉसिलीझुमॅब विक्रीच्या बोगस जाहिराती व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. सदर बाब लक्षात येताच मुंबई पोलीस दलाच्या सायब गुन्हे नियंत्रण कक्षाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
    कोरोनाची दुसरी लाट येताच मुंबईसह राज्यात रेमडेसिवीर व टॉसिलीझुमॅब या इंजेक्शनचा तुटवडा होऊ लागला. परिणामी काही भामट्यांनी या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू केला. याबाबत समजताच शासनाने काही निर्बंध आणून हे इंजेक्शन थेट सरकारी व खाजगी रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात इंजक्शनचा काळाबाजार संपुष्टात आला आहे, तर दुसरीकडे काळाबाजार करणाऱ्यांव पोलिसांचे पथक लक्ष ठेवू लागले.
    कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांच्या उपचारात रेमडेसिवीर इंजक्शन प्रामुख्याने उपयोगी पडू आहेत. हे इंजक्शन दिल्याने अनेकांनी कोरोनावर मात केली. परिणामी रेमडेसिवीरची मागणी वाढू लागली. सदर बाब काही भामट्यांच्या लक्षात आली आणि एकाएकी बाजारात रेमडेसिवीरचा तुटवडा झाला. नातेवाईकांना कोरोनाची लागण झाल्याने अनेक जण वाटेल त्या पैशांमध्ये इंजेक्शन विकत घेऊ लागले. ज्यांना शक्य होते ते अव्वाच्या सव्वा पैसे देऊन इंजेक्शन खरेदी करू लागले. मात्र ज्यांची परिस्थती नाही त्यांच्या वाटल्याला दु:खाचे क्षण आले. याबाबत माहिती मिळताच मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने रेमडेसिवरीर इंजेक्शनचा काळाबाजर करणाऱ्यांना तुरुंगात धाडण्यात सुरुवात केली. एकामागो माग एक सरस कारवाया करून काळाबाजारावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले.
    कुटुंबीयात कोणालाही काेरोनाची लागण झाल्यास काळजी करू नका. त्यांना गरज असल्यास रुग्णालयात अथवा कोविड सेंटरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सिप्ला फार्मा कंपनीच्या नावाने रेमडेसिवीर व टॉसिलीझुमॅब हे इंजेक्शन विकले जात असल्याची जाहिरात व्हायरल होत आहे. सदर जाहिरातींना बळी पडू नका. कोणत्याही लिंकला क्लिक करून त्याद्वारे बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करू नका. अन्यथा फसवणुकीला बळी पडाल, असे आवाहन मुंबई पोलीस दलाच्या सायबर गुन्हे नियंत्रण कक्षाने नागरिकांना केले आहे.