बोगस महिला डॉक्टरला अटक; हवालदार कांबळेंमुळे गुन्ह्याची उकल

पिंकीने शॉ हिने शांती केअर क्लीनिक  नावाने दवाखाना थाटला होता. त्या दवाखान्यात येणा-या लोकांना औषधे गोळ्या देत होती. या प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कायद्यानुसार व भादंवि कलमांनुसार गुन्हा दाखल करून पिंकी शॉ हिला अटक करण्यात आल्याचे कक्ष १० च्या पथकाने सांगितले.

    मुंबई: वैद्यकीय शिक्षण घेतले नसतानाही दवाखाना थाटून औषधे-गोळ्या देणाऱ्या बोगस महिला डॉक्टर पिंकी शॉ (३२) हिला अटक करण्यात आली. सदर कारवाई हवालदार सतीश कांबळे यांना मिळालेल्या मािहतीच्या आधारे क्राईम ब्रॅंच युनिट १० च्या पथकाने केली. या कारवाईदरम्यान स्टेस्थोस्कोप, प्रिस्क्रिप्शन बूक, औषध, इंजेक्शन अन्य साहित्यांसह पिंकीला आरे कॉलनी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

    कोरोना संकट काळात गैर धंद्यांना मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस सह आयुक्त मिलिंद भारंबे यांनी कारवाई करण्याचे आदेश गुन्हे प्रकटीकरण पथकाला दिले. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष १०चे पथक गैरधंद्यांवर लक्ष ठेवून असताना हवालदार सतीश कांबळे यांना बोगस महिला डॉक्टरची माहिती समजली . त्यानुसार कक्ष १० च्या पथकाने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह गोरेगाव पूर्व परिसरातल्या आरे मिलक कॉलनी येथील शांती केअर क्लिनिकमध्ये धाड टाकली. त्यावेळी पिंकी शॉ ही गळ्यात स्टेस्थोस्कोप अडकवून बसली होती. युनिट १० व वैद्यकीय अधिका-यांनी तिच्याकडे वैद्यकीय प्रमाणपात्र मागितले. पिंकीने दाखवलेले प्रमाण पत्र बोगस असल्याचे चौकशीत आढळून आले.
    सदर कारवाई गुन्हे प्रकटीकरणचे उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धार्थ शिंदे, युिनट १० चे प्रभारी पोलीस निरीक्षक महेशकुमार ठाकूर, पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, विजय सांडभोर, धनराज चौधरी, अंमलदार सतीश कांबळे, रमेश नलावडे, रामकिसन मोरे, प्रकाश चव्हाण, महिला अंमलदार दया खाडे आदी पथकाने केली.

    लोकांच्या जीवाशी खेळ
    कुठल्याही प्रकारे वैद्यकीय शिक्षण न घेता पिंकीने शॉ हिने शांती केअर क्लीनिक  नावाने दवाखाना थाटला होता. त्या दवाखान्यात येणा-या लोकांना औषधे गोळ्या देत होती. अशा प्रकारे लोकांच्या जिवाशी खेळणा-या पिंकी शॉ हिला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आरे  पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कायद्यानुसार व भादंवि कलमांनुसार गुन्हा दाखल करून पिंकी शॉ हिला अटक करण्यात आल्याचे कक्ष १० च्या पथकाने सांगितले.