बोगस एफडीए अधिकाऱ्याला बेड्या; कुलाबा पोलिसांची कारवाई

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील गजबजलेल्या कुलाबा परिसरामध्ये अनिल वाघेला यांचे औषध विक्रीचे दुकान आहे. अनिल वाघेला यांना काही दिवसांपूर्वी राहुल सराटे याने आपले नाव बदलून समर्थ कुलकर्णी नावाने फोन केला होता. आपण अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयातून बोलत असून, तुमच्या विरोधात सुरेखा पाटील नावाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. सदरच्या तक्रारदाराने तुम्ही त्यांना मुदत संपलेले बोर्णविटा विक्री केल्याचे म्हटले आहे. जर या संदर्भात कारवाई टाळायची असेल, तर तक्रारदार सुरेखा पाटील यांना फोन करून प्रकरण मिटवावे असे आरोपीने अनिल वाघेला यांना सांगितले.

    मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचा अधिकारी असल्याचे सांगत, औषधे विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून १० हजार रुपये घेणाऱ्या आरोपीला कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे. अशाच एका प्रकरणात या आरोपीला यापूर्वी देखील अटक झाली होती. राहुल सराटे असे या आरोपीचे नाव आहे.

    घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील गजबजलेल्या कुलाबा परिसरामध्ये अनिल वाघेला यांचे औषध विक्रीचे दुकान आहे. अनिल वाघेला यांना काही दिवसांपूर्वी राहुल सराटे याने आपले नाव बदलून समर्थ कुलकर्णी नावाने फोन केला होता. आपण अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयातून बोलत असून, तुमच्या विरोधात सुरेखा पाटील नावाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. सदरच्या तक्रारदाराने तुम्ही त्यांना मुदत संपलेले बोर्णविटा विक्री केल्याचे म्हटले आहे. जर या संदर्भात कारवाई टाळायची असेल, तर तक्रारदार सुरेखा पाटील यांना फोन करून प्रकरण मिटवावे असे आरोपीने अनिल वाघेला यांना सांगितले.

    यानंतर अनिल वाघेला यांनी सदरच्या सुरेखा पाटील या महिलेला फोन करून चौकशी केली असता, सुरेखा पाटील या महिलेने त्यांना सांगितले की, तुमच्या दुकानातून आणलेला बोर्णविटा मी माझ्या मुलाला दिल्यानंतर त्याला विषबाधा झाली, विषबाधा झाल्यामुळे त्याला दोन दिवस रुग्णालयात ठेवावे लागले. प्रकरण मिटवायचे असेल तर तुम्हाला मला १८३०० रुपये द्यावे लागतील.

    सुरुवातीला अनिल वाघेला यांनी या महिलेला दहा हजार रुपये दिले. मात्र उरलेल्या पैशांंसाठी या महिलेले वाघेला यांच्याकेड तगादा लावला होता. याचदरम्यान त्यांना शंका आल्याने त्यांनी याबाबत कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. यादरम्यान अनिल वाघेला यांच्या लक्षात आले की, अशाच एका प्रकरणामध्ये त्यांच्या परिसरात असलेल्या औषध विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला या आरोपीने फसवले होते, व आरोपीला अटक देखील करण्यात आली होती. अनिल वाघेला यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पुन्हा एकदा पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.