Bollywood actress Shilpa Shetty's husband and famous businessman Raj Kundra arrested; Pornographic video recording case

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक झाली आहे. मुंबई पोलिसांच्या पोलीसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर रात्री उशीरा पोलिसांनी राज कुंद्रा यांना अटक केल्याचे वृत्त समोर आले.अश्लिल चित्रफीत रेकॉर्डींग प्रकरणात कुंद्रा यांना अटक झाल्याचे समजते. पोर्नग्राफ व्हिडीओ रेकॉर्ड करणे आणि तो सोशल माध्यमांवर प्रसिद्ध करण्याचे प्रकरण समोर आले होते. 

    मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक झाली आहे. मुंबई पोलिसांच्या पोलीसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर रात्री उशीरा पोलिसांनी राज कुंद्रा यांना अटक केल्याचे वृत्त समोर आले.अश्लिल चित्रफीत रेकॉर्डींग प्रकरणात कुंद्रा यांना अटक झाल्याचे समजते. पोर्नग्राफ व्हिडीओ रेकॉर्ड करणे आणि तो सोशल माध्यमांवर प्रसिद्ध करण्याचे प्रकरण समोर आले होते.

    फेब्रुवारी 2021 मध्ये या प्रकरणी एक तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी एका अभिनेत्रीलाही अटक केली होती. चित्रपट बनवणाऱ्या अनेक लोकांची चौकशी करण्यात आली होती.  कुंद्रा यांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. तब्बल 7 ते 8 तास त्यांची चौकशी करण्यात आली. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. चौकशी तसेच सबळ पुराव्यांच्या आधारावर कुंद्रा यांना पोलिसांनी अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.यापूर्वी मार्च 2020 मध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध मुंबईतील एक नॉन-रेसिडेन्शिअल इंडियन उद्योगपती सचिन जे. जोशी यांनी पोलिसात तक्रारीत केली होती.  हे प्रकरण सोन्याचा व्यापार करणारी कंपनी ‘सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड’शी (एसजीपीएल) संबंधित होतं. कुंद्रा हे यापूर्वी या कंपनीचे माजी संचालक होते. मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये जोशी यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा, गणपती चौधरी, मोहम्मद सैफीसह एसजीपीएलच्या इतर अधिकाऱ्यांवर फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.

    यापूर्वीही शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा अनेक वादात सापडले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची यांच्यासोबत राज कुंद्राचे आर्थिक संबंध असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला आहे. ईडीने यासंबंधी कुंद्रा यांना नोटीसही दिली होती. पण कुंद्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते.