बॉलिवूड-ड्रग्ज कनेक्शन, हाथरस षडयंत्राची माहिती आहे, तर विजय माल्याबाबत का नाही ?, शिवसेनेचा केंद्र सरकारला सवाल

विरोधी पक्ष जेव्हाही याबाबतची विचारणा सरकारकडे करते, तेव्हा त्यांच्याकडे कोणतेही आकडे उपलब्ध नसतात, न्यायलयात जेव्हा याबाबतची माहिती सरकारला विचारते, तेव्हा याबाबतची माहिती नसल्याचे कारण सरकारी वकील देतात, सरकार किती प्रकरणात आणि किती वेळा ‘माहिती नाही’ असे सांगणार आहे, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

मुंबई : परदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय माल्याच्या ( Vijay Mallya) प्रत्यार्पणास होत असलेल्या विलंबाप्रकरणी ब्रिटनमध्ये सुरु असलेल्या गोपनीय कारवाईची महिती नाही, अशी माहिती केंद्र सरकारने (central government) सुप्रीम कोर्टात (SC) दिली आहे. या मुद्द्यावरुन शिवसेनेने केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. सरकार किती वेळा माहित नाही, अशी भूमिका मांडणार आहे, असा सवाल शिवसेनेच्या मुखपत्रात उपस्थित करण्यात आला आहे.

विरोधी पक्ष जेव्हाही याबाबतची विचारणा सरकारकडे करते, तेव्हा त्यांच्याकडे कोणतेही आकडे उपलब्ध नसतात, न्यायलयात जेव्हा याबाबतची माहिती सरकारला विचारते, तेव्हा याबाबतची माहिती नसल्याचे कारण सरकारी वकील देतात, सरकार किती प्रकरणात आणि किती वेळा ‘माहिती नाही’ असे सांगणार आहे, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

एका अभिनेत्याने केलेली आत्महत्या, बॉलिवूड-ड्रग्ज संबंध आणि हाथरस प्रकरणातल कथित षडयंत्रांची पूर्ण माहिती सरकारकडे आहे, मात्र देशातून कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेलेल्या विजय माल्याबाबत सुरु असलेल्या कारवाईबाबत सरकारकडे माहिती नाही, हे आश्चर्यजनक असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. मद्य उत्पादक विजय माल्या, सुमारे ९ हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यातील आरोपी असून, तो देश सोडून पळालेला आहे. सध्या माल्या ब्रिटनमध्ये आहे.

विजय माल्याविरोधात तिथे सुरु असलेली न्यायालयीन आणि गोपनीय कारवाई संपत नाही, तोपर्यंत त्याचे प्रत्यार्पण होणे अवघड आहे, असे केंद्र सरकारतर्फे सोमवारी सुप्रीम कोर्टात सांगण्यात आले. विजय माल्याविरोधात सुरु असलेल्या या प्रकरणात प्रतिवादी नसल्याने, या कारवाईबाबत भारताला काहीही माहिती नसल्याचेही सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. यावरुनच शिवसेनेने केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.