बाप्पा पावला! गौरी-गणपतीसाठी राज्यातून १७७१ एसटी गाड्यांचे बुकिंग; आरक्षणामध्ये यंदा वाढ

गतवर्षी कोविड व कडक निर्बंधामुळे बहुतांशी चाकरमान्यांनी गाैरी-गणपती उत्सवाकडे पाठ फिरविली हाेती. पण यंदा नियम शिथिल करण्यात आले आहेत शिवाय अनेक नागरिकांचा लसीचा पहिला व दुसरा डाेस पूर्ण झाला आहे. यामुळे एसटी आरक्षणामध्ये वाढ झाली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  • मुंबई विभागातून १६८२ गाड्या आरक्षित
  • पुणे विभागातून ८९ गाड्या आरक्षित
  • एकूण १७९२ गाड्या आरक्षित
  • एसटीच्या आरक्षणामध्ये यंदा वाढ

मुंबई : गाैरी-गणपती म्हटलं की, चाकरमान्यांना गावाचे वेध लागतात. अशावेळी चाकरमान्यांचा अधिकाधिक कल हा एसटी कडे असताे. लालपरी राज्याच्या कानाकाेपऱ्यात धावत असल्याने चाकरमान्यांच्या घरापर्यंत पाेहचत असते, शविाय एसटीचा प्रवास हा सुखकर असताे. परिणामी, चाकरमानी एसटीची आगामी बुकिंग करतात अथवा ग्रुप आरक्षण करतात.

गतवर्षी कोविड व कडक निर्बंधामुळे बहुतांशी चाकरमान्यांनी गाैरी-गणपती उत्सवाकडे पाठ फिरविली हाेती. पण यंदा नियम शिथिल करण्यात आले आहेत शिवाय अनेक नागरिकांचा लसीचा पहिला व दुसरा डाेस पूर्ण झाला आहे. यामुळे एसटी आरक्षणामध्ये वाढ झाली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

यंदा मुंबई प्रदेश अंतर्गत आतापर्यंत १६८२ एसटीचे बुकिंग झाले आहे. तर पुणे प्रदेश अंतर्गत ८९ बुकिंग झाले आहे. २५ आगॅस्टपर्यंत एकूण १७७१ एसटीचे बुकिंग झाले असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

गाैरी-गणपती सण राज्यात माेठ्या उत्साहात साजरा केला जाताे. मागील दीड वर्ष काेराेना काळात उत्सव साजरे करण्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. पण यंदा गाैरी-गणपतीसाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली असल्याचे समाेर येत आहे. यंदा रेल्वे तसेच इतर खासगी वाहनांची बुकिंग फुल्ल झाली आहे.

त्याचबराेबर एसटीचे आरक्षणही फुल्ल असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. २४ ऑगस्टपर्यंत राज्यात १७७१ गाड्यांचे बुकिंग झाले आहे. यात पूर्ण व ग्रुप व अंशत: आरक्षण आहे. येत्या काही दिवसात एसटीची अजून बुकिंग हाेण्याची शक्यता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई व पुणे विभागांतर्गत गाैरी गपणतीसाठी आरक्षित जादा वाहतूक स्थिती (२४ आगॅस्टपर्यंत)

विभागाचे नाव ग्रुप आरक्षण पूर्ण आरक्षण अंशत: आरक्षण एकूण
मुंबई विभाग    २८१ १४० ५४ ४७५
पालघर विभाग १६५ ७१ ११ २४७
रायगड विभाग  १६ ०२ १८
रत्नागिरी विभाग १४२ १७७ ३१९
सिंधुदुर्ग विभाग २२ ०७ २९
ठाणे विभाग १४९ ३९४ ५१ ५९४
मुंबई प्रदेश ५९५ ७८५ ३०२ १६८२
पुणे प्रदेश २३ ६६ ८९
एकूण ५९५ ८०८ ३६८ १७७१

गौरी-गणपतीसाठी एसटीच्या बुकिंग दिवसेंदिवस वाढत आहेत. येत्या काही दिवसात ही बुकिंग अजून वाढण्याची शक्यता आहे. गावी जाण्याच्या बुकिंग बरोबर पुन्हा येतानाचीही बुकिंग होत आहेत. ही बाब दिलासादायक आहे.

अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ