बृहन्मुंबई महापालिका  क्षेत्रातील रस्त्यांवर बहरली बोगनवेलियाची झाडे

मुंबई: बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी बोगनवेलियाची झाडे आता बहरास आली आहेत. यापैकी ''ए'' विभागाच्या कार्यक्षेत्रांतर्गत ''कफ परेड'' परिसरात ''जगन्नाथ भोसले मार्ग'' व ''नाथालाल पारेख मार्ग'' हे दोन मार्ग ज्या स्व. दीपक जोग चौकात एकत्र येतात, त्या ठिकाणी महापालिकेचे एक वाहतूक बेट आहे.

 मुंबई: बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी बोगनवेलियाची झाडे आता बहरास आली आहेत. यापैकी ‘ए’ विभागाच्या कार्यक्षेत्रांतर्गत ‘कफ परेड’ परिसरात ‘जगन्नाथ भोसले मार्ग’ व ‘नाथालाल पारेख मार्ग’ हे दोन मार्ग ज्या स्व. दीपक जोग चौकात एकत्र येतात, त्या ठिकाणी महापालिकेचे एक वाहतूक बेट आहे. या वाहतूक बेटाचे सुशोभीकरण व आवश्यक ती नियमित देखभाल महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे सातत्याने करण्यात येते.  याच वाहतूक बेटावर लावलेली बोगनवेलिया ची झाडे आता बहरास आली आहे.

कमी पाण्यातही फुलांनी भरभरून बहरणारी शोभेची झाडे म्हणून बोगनवेलिया जगभरात सुविख्यात आहेत. दरवर्षी ऑक्टोबर ते जून या नऊ महिन्यांच्या कालावधीत या झाडाला फुले येतात. मात्र या नऊ महिन्यांच्या कालावधीतही ‘मे’ महिन्यात या झाडांचा बहर सर्वाधिक असतो. जणू ‘मे’ महिन्यातल्या तळपत्या उन्हातही कागदी फुलांसारख्या अलवार वाटणाऱ्या आपल्या बहुरंगी-बहुढंगी फुलापानांनी वातावरणात नेत्रसुखद गारवा तयार करण्याचा बोगनवेलियाचा प्रयत्न असतो.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात  अनेक ठिकाणी असलेली ही बोगनवेलियाची झाडे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.