birthday cake cutting by sword

कोरोना काळात मोठ्या संख्येनं लोकांची गर्दी जमवून लग्न आणि वाढदिवस (Marriage and Birthday) साजरे होत आहेत. अशातच एका वाढदिवसाचा(Birthday Video) व्हिडिओ(Cake Cutting By Sword Video) सध्या समोर आला आहे.

    गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा संसर्ग (Corona pandemic) वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता, प्रशासनाकडून  विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. असं असूनही काही नागरिक मात्र कोरोना नियमांच उल्लंघन करताना दिसत आहेत. कोरोना काळात मोठ्या संख्येनं लोकांची गर्दी जमवून लग्न आणि वाढदिवस (Marriage and Birthday) साजरे होत आहेत. अशातच एका वाढदिवसाचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.


    या व्हिडिओमध्ये काही लहान मुलं एकत्र आली आहेत. धारदार शस्त्राचं प्रदर्शन करत आरोपींनी तलवारीनं केक कापला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.३० जून रोजी वाढदिवसाचा हा व्हिडीओ पोलिसांच्या निदर्शनास आला आहे. यामध्ये काही लहान मुलं तलवारीनं केक कापताना (Cake Cutting With A Sword) दिसत आहेत.

    याप्रकरणी मुंबईतील राजीव गांधी नगर भागातील बंगालीपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत दोन प्रमुख आरोपींना अटक केली आहे. अफझल अलाउद्दीन शेख आणि अशरफ शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

    संबंधित आरोपींनी २९ जून २०२१ रोजी रात्री १० च्या सुमारास आपल्या लहान मुलाच्या वाढदिवसाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी कोरोनाकाळातही आरोपींनी अन्य लहान मुलांना एकत्र जमवलं होतं. याशिवाय केक तलवारीनं कापून वाढदिवस साजरा केला होता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोघांना तुरुंगवारी घडवली आहे.

    कोरोना साथीच्या काळात मोठ्या संख्येनं एकत्रित येणे, जमावबंदी असूनही अशाप्रकारचा वाढदिवस साजरा करणे. लहान मुलांना एकत्र करत त्यांच्या जीवाशी खेळणे, अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.