सरकार पाडण्यासाठी आर्मी आणा; संजय राऊतांची रोख-ठोक टीका

    मुंबई : सरकार अस्थिर करण्यासाठी ईडी, सीबीआय आणि इनकम टँक्सचा वापर होताना स्पष्टपणे दिसत आहे. ईडी आणि सीबीआयचे प्रयत्न संपले की मग महाराष्ट्रात सैन्य आणा राज्य सरकार पाडायला अशी रोख-ठोक टीका शिवसेना खासदार संजय राऊतांनी केली आहे.

    दिल्लीत एवढे अप्रूप काय आहे. शरद पवार, फडणवीसही दिल्लीत गेले लगेच बातम्या सुरू. त्यांच्या पक्षाचे प्रमख नेते दिल्लीत बसतात म्हणून ते गेले असतील. दिल्लीतल्या नेत्याकडूनच त्यांना आदेश घ्यावे लागतात.

    पण दिल्लीत गेलो की लगेच हालचाल होते. खासदार असल्यामुळे आमचे काही घटनात्मक विषय असतात त्यामुळे जावे लागते असा खुलासा राऊतांनी केला आहे.