मुंबईत इमारत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, १८ जण गंभीर, पत्त्याप्रमाणे पडली घरं

मालाड पश्चिमेच्या मालवणी भागातील एका तीन मजली इमारतीचा दुसरा आणि तिसरा मजला हा शेजारी असणाऱ्या एक मजली चाळीवर कोसळल्यामुळे ही गंभीर घटना घडली. बुधवारी रात्री ११ वाजता ही दुर्घटना घडल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या ११ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर८ जण गंभीर जखमी झाले. 

  मुंबईच्या मालाड भागात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मालाड पश्चिमेतील मालवणी भागात ही दुर्घटना घडलीय. या घटनेत १८ जण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती मिळतेय. मुंबई महापालिका आणि अग्निशमन विभागाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आलं असून जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलंय.

  मालाड पश्चिमेच्या मालवणी भागातील एका तीन मजली इमारतीचा दुसरा आणि तिसरा मजला हा शेजारी असणाऱ्या एक मजली चाळीवर कोसळल्यामुळे ही गंभीर घटना घडली. बुधवारी रात्री ११ वाजता ही दुर्घटना घडल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या ११ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर८ जण गंभीर जखमी झाले.

  रात्रीच्या वेळेस ही दुर्घटना घडल्यामुळे अनेकजण झोपेत होते. त्यामुळे काही समजण्यापूर्वीच अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलंय. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेकजण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे मृत्युंचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त  करण्यात येतेय. त्यातच मुंबईत पाऊस सुरू असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत असून कामाचा वेग मंदावत असल्याचं सांगितलं जातंय.

  मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिलीय. सुरुवातीला दुमजली घर कोसळले. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशी तीन घरे कोसळली. यातील एका घरात ७ जण राहत होते. त्यापैकी ५ जणांना वाचवण्यात यश आलंय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीय.

  मृतांची नावे

  १. साहिल सर्फराज सय्यद – ९ वर्षे

  २. अरिफा शेख – ८ वर्षे

  ३. अज्ञात पुरुष – ४० वर्षे

  ४. अज्ञात पुरुष – १५ वर्षे

  ५. अज्ञात मुलगी – ८ वर्षे

  ६. अज्ञात मुलगी – ३ वर्षे

  ७. अज्ञात मुलगी – ५ वर्षे

  ८. अज्ञात महिला – ३० वर्षे

  ९. अज्ञात महिला – ५० वर्षे

  १०. अज्ञात मुलगा – ८ वर्षे

  ११. जॉन इराना – १३ वर्षे