प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

सर्वसामान्य प्रवाशांसाठी अद्याप मुंबई लोकल सुरु झालेली नसल्याने बेस्ट बसेसची संख्या अपुरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर बेस्टने एसटी महामंडळाच्या गाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. १ ऑगस्ट २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत एसटी महामंडळाच्या चालवण्यात येत असलेल्या अत्यावश्यक सेवा वाहतुकीचे भाड्यापोटी ५ कोटी ९२ लाख २१ हजार ३४१ रुपये पालिकेला द्यावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

मुंबई (Mumbai).  सर्वसामान्य प्रवाशांसाठी अद्याप मुंबई लोकल सुरु झालेली नसल्याने बेस्ट बसेसची संख्या अपुरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर बेस्टने एसटी महामंडळाच्या गाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. १ ऑगस्ट २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत एसटी महामंडळाच्या चालवण्यात येत असलेल्या अत्यावश्यक सेवा वाहतुकीचे भाड्यापोटी ५ कोटी ९२ लाख २१ हजार ३४१ रुपये पालिकेला द्यावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

सर्वसामान्य मुंबईकरांच्या सेवेत ८ जूनपासून बेस्ट बसेस धावू लागल्या आहेत. परंतु लोकलचे दरवाजे सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंदच असल्याने प्रवाशांचा भार बेस्ट बसेसवर येत आहे. बेस्ट बसेसमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने एसटी महामंडळाच्या एक हजार गाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या. बेस्ट उपक्रमासमोर आर्थिक अडचण असल्याने या गाड्यांच्या भाड्याचे पैसे मुंबई महापालिकेने देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांसाठी एसटीच्या गाड्या पालिकेने आधीच घेतल्या होत्या. त्यात सर्वसामान्य प्रवाशांसाठीही पालिकेने एक हजार गाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या असून त्या भाड्याचे पैसे पालिका एसटी महामंडळाला मोजत आहे. प्रति किलोमीटर ४४ रुपये या दराने एक हजार गाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत.

यापूर्वी ६ मे ते ३ जुलै या कालावधीतील ९ कोटी ६५ लाख व २१ मे ते २ जुलै या कालावधीतील १६ कोटी ९ लाख १२ हजार ६४२ रुपये असे एकूण ३६ कोटी ४४ लाख रुपये गाड्याच्या भाड्यापोटी पालिकेने महामंडळाला यापूर्वी दिले आहेत. त्यानंतर आता १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत अत्यावश्यक सेवा वाहतुकीचे ३२,८५, ६४४ एवढी किमी झाले आहे. प्रत्येक किलो मीटरचे ४४ रुपये दराने १४ कोटी ४५ लाख ६८ हजार ३३६ एवढी रक्कम होते. मात्र या कालावधीत अत्यावश्यक सेवा शासकीय कर्मचारी वगळता इतर प्रवाशांकडून प्रवासापोटी प्राप्त झालेली ८ कोटी ५३ लाख ४६ हजार ९९५ रुपये रक्कम वगळून ५ कोटी ९२ लाख २१ हजार ३४१ रुपये भाड्यापोटी एसटी महामंडळाला देणे बाकी आहे. ही देय असलेली रक्कम मिळावी अशी विनंती महामंडळाने पालिकेला केली आहे.