चोर बाजारातील रस्ते वर्षभरापासून बंद असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान, महापौरांना आहे का ‘त्या’ आश्वासनाचे भान ?

सॅण्डहर्स्ट रोड येथील बोरी मोहल्ला या चोर बाजार(chor bazaar) परिसरातील रहदारीचे रस्ते खासगी विकासकाने गेल्या वर्षभरापासून बंद(road closed) केले आहेत. या रस्त्यांबाबत महापौर किशोरी पेडणेकर(mayor kishori pednekar) यांनी दिलेले आश्वासन पाळावे,याची आठवण करून देण्यासाठी येथील व्यापाऱ्यांनी गुरुवारी महापौर बंगल्यावर(protest at mayor bunglow) आंदोलन करून लक्ष वेधले.

मुंबई: सॅण्डहर्स्ट रोड येथील बोरी मोहल्ला या चोर बाजार(chor bazaar) परिसरातील रहदारीचे रस्ते खासगी विकासकाने गेल्या वर्षभरापासून बंद(road closed) केले आहेत. हे रस्ते पालिकेच्या अखत्यारित असतानाही कोणीही लक्ष देत नसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. आता तर व्यापाऱ्यांना इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या रस्त्यांबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेले आश्वासन पाळावे,याची आठवण करून देण्यासाठी येथील व्यापाऱ्यांनी गुरुवारी महापौर बंगल्यावर आंदोलन करून लक्ष वेधले.

सॅन्डहर्स्ट रोड येथील बोरी मोहल्ला परिसरातील रस्ते नेहमी गजबजलेले असतात. या परिसरात विकासकांचा वावर वाढल्याने येथील रहदारीचे बंद अवस्थेत आहेत. आधीच कोरोनाच्या संकटामुळे हैराण असलेले छोट्या – मोठ्या व्यापाऱ्यांच्या समस्येत आणखी भर पडली आहे. गेले वर्षभर हे रस्ते बंद असल्याने व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. आता तर व्यापाऱ्यांनाच हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पालिकेचे रस्ते असतानाही त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. ही समस्या सोडवण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यापाऱ्यांना आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणत्याही हालचाली नसल्याने त्यांना त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. चोरबाजार परिसरात महापालिकेकडून कारवाई करण्यात येते आहे. त्यामुळे आम्ही कुठे जायचे असा सवालही व्यापाऱ्यांकडून विचारला जातो आहे.

चोर बाजार परिसरातील हे व्यवसासायिक मागील ५० ते ६० वर्षापासून पिढ्यानपिढ्या व्यवसाय करत आहेत. त्यांना आता याठिकाणाहून हटवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहे. येथे खासगी विकासकाने रहदारीचे रस्ते बंद केले आहेत, एक वर्ष झाले रस्ते बंद आहेत. पालिकेचे हे रस्ते असतानाही कोणी लक्ष देत नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

महापौर शब्द पाळा
महापौर किशोरी पेडणेकर यांनी टाळेबंदीपूर्वी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही,असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर अजूनही तोडगा निघाला नसून समस्या कायम आहे. त्यांना याची आठवण करून देण्यासाठी आम्ही आंदोलन करत असल्याचे व्यापारी आंदोलकांचे म्हणणे आहे.