माजी राज्य मंत्री एकनाथ गायकवाड यांना मंत्रिमंडळाची श्रद्धांजली

राज्याचे माजी राज्य मंत्री, माजी संसद सदस्य, ज्येष्ठ नेते एकनाथ महादेव गायकवाड यांच्या निधनाबद्धल आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली  वाहण्यात आली. यावेळी शोकप्रस्ताव वाचताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,  राज्यातील समाजकारण-राजकारणातील दोन पिढ्यांसाठीचे मार्गदर्शक असे नेतृत्व आपण गमावले आहे. एकनाथ गायकवाड यांनी राजकारण आणि समाजकारणाचा समतोल साधत, पुढच्या पिढीसाठीही मार्गदर्शक अशा कामाचा आदर्श घालून दिला अशा शब्दांत मंत्रिमंडळाच्या भावना व्यक्त केल्या.

    मुंबई : राज्याचे माजी राज्य मंत्री, माजी संसद सदस्य, ज्येष्ठ नेते एकनाथ महादेव गायकवाड यांच्या निधनाबद्धल आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली  वाहण्यात आली.

    यावेळी शोकप्रस्ताव वाचताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,  राज्यातील समाजकारण-राजकारणातील दोन पिढ्यांसाठीचे मार्गदर्शक असे नेतृत्व आपण गमावले आहे. एकनाथ गायकवाड यांनी राजकारण आणि समाजकारणाचा समतोल साधत, पुढच्या पिढीसाठीही मार्गदर्शक अशा कामाचा आदर्श घालून दिला अशा शब्दांत मंत्रिमंडळाच्या भावना व्यक्त केल्या.

    महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं मुंबईतील रुग्णालयात निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उत्तरोत्तर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज (बुधवार) सकाळी १० वाजण्याच्या सुमाराला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    कोरोनाचा सध्या धुमाकूळ घालत असलेला दुसरा स्ट्रेन हा अतिशय भयंकर असून काही दिवसांतच रुग्णांची प्रकृती ढासळत असल्याचं दिसून आलंय. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची तब्येत वेगानं ढासळत गेली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.