Called because I was a little worried ... After speaking, the nurse who answered the call was surprised Grandma's post went viral on social media

सध्या सर्वत्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना आपला पेशंट कसा आहे याची वेळेवर माहिती मिळत नसल्याने त्रस्त आहेत. तर, उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आपल्या नातेवाईकांशी संपर्क होत नसल्याने ते देखील बैचेन आहेत. अशातच एका आजीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आजीने नर्सशी साधलेला संवाद निश्चितच सकारात्मक प्रेरणा देणारा आहे.

  मुंबई : सध्या सर्वत्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना आपला पेशंट कसा आहे याची वेळेवर माहिती मिळत नसल्याने त्रस्त आहेत. तर, उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आपल्या नातेवाईकांशी संपर्क होत नसल्याने ते देखील बैचेन आहेत. अशातच एका आजीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आजीने नर्सशी साधलेला संवाद निश्चितच सकारात्मक प्रेरणा देणारा आहे.

  असा आहे व्हायरल झालेला संवाद

  आजींनी हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि म्हणाल्या..
  मला रूम नंबर ३०२ मधल्या निर्मला नेने यांची तब्येत कशी आहे ते कळू शकेल का..?
  जरा काळजी वाटतीये म्हणून फोन केला..
  जरा दोन मिनिटं होल्ड करा हं’ असं म्हणत तिथल्या ऑपरेटरनी तिसऱ्या मजल्यावरच्या नर्सशी फोन जोडून दिला.
  नर्स म्हणाली – बऱ्या आहेत त्या आता बीपी पण नॉर्मल झालंय आणि सगळ्या टेस्ट्स पण नॉर्मल आल्यात..
  डॉक्टर म्हणतायत उद्या सोडतील घरी त्यांना.
  वा वा..! खूप बरं वाटलं ऐकून..! धन्यवाद!” – आजी म्हणाल्या.
  नर्स : तुम्ही त्यांची बहीण बोलताय का?
  नाही, मी स्वतः निर्मला नेने बोलतीये ३०२ मधून..!
  मला कोणीच काही धड सांगेना, म्हणून म्हणलं स्वतःच चौकशी करावी..!!
  आत्मनिर्भर आजी.. 🤣😀🙏🏻

  या पोस्ट सह स्वत:च्या तब्येतीची विचारपूस करणाऱ्या आजीचा फोटो देखील व्हायरल झाला आहे. आजीने नर्ससह साधलेला संवाद वाचून या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मात्र, ही आजी कुठे राहते. कोणत्या रुग्णालायत त्यांनी उपचार घेतला याबाबत काहीच माहिती मिळू शकलेली नाही.