Calling for restraint to the Maratha agitators giving reasons for Corona and on the other hand ... Sambhaji Raje's question to Ashok Chavan

    मुंबई : मराठा आरक्षणांच्या मुद्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे प्रमुख माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये पार पडलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीवर आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जोरदार टीका करत हे बरोवर आहे का ? असाराज्य सरकारलाही सवाल केला आहे.

    आंदोलनात मोठ्या प्रमाणात गर्दी

    इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन आज काँग्रेसकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आले. त्यात सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये पार पडलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यानंतर मराठा आंदोलनाचे नेते खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारलाही सवाल केला की कोरोनाचे कारण देत मराटा  आंदोलकाना आंदोलनापासून दूर राहण्याचे आवाहन करताना स्वत:. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली हे योग्य आहे का?

    आता हे बरोबर आहे का?

    संभाजीराजे छत्रपती यांनी व्टिट करत टीका केली की, एकीकडे कोरोनाचा उद्रेक तर दुसरीकडे अशोकरावांचे आंदोलन…त्यात ते म्हणताय विराट मोर्चा झाला, जोरदार आंदोलन पार पडले अणि त्यात सहभागी झालेल्या जेष्ट नागरिक आणि लहान मुलांचे आभार मानले. आता हे बरोबर आहे का? असा प्रश्न संभाजीराजे यांनी केला.