पाकव्याप्त काश्मीर म्हणणं हा मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान : संजय राऊत

पाकव्याप्त काश्मीर म्हणणं हा मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही मुंबई १०६ हुतात्म्यांनी मिळवली आहे. या मुंबईचं रक्षण आमच्या पोलिसांनी केलं आहे. 26/11 चा हल्ला मुंबई पोलिसांनी परतवला, कसाबला याच पोलिसांनी पकडलं, अशा या मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगणा रणौतवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी निशाणा साधला आहे. पाकव्याप्त काश्मीर म्हणणं हा मुंबई आणि महाराष्ट्राचा (Mumbai and Maharashtra) अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही मुंबई १०६ हुतात्म्यांनी मिळवली आहे. या मुंबईचं रक्षण आमच्या पोलिसांनी केलं आहे. 26/11 चा हल्ला मुंबई पोलिसांनी परतवला, कसाबला याच पोलिसांनी पकडलं, अशा या मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी. अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांचा कंगनावर हल्लाबोल

मी कोणाचंही नाव घेणार नाही. पण जर कोणी म्हणत असेल मी धमकी दिली तर मी पोकळ धमकी देत नाही, ते काम माझं नाही, असली नौटंकी मी करत नाही. मी शिवसैनिक असून अॅक्शनवाला माणूस आहे. तेव्हा या ज्या मेंटल केसेस वाढल्या आहेत त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊतांचा अप्रत्यक्षपणे राम कदमांवर हल्लाबोल

राम कदमांनी कंगना रनौतची तुलना झाशीच्या राणीशी करणं हा सर्वात मोठा अपमान आहे, झाशीची राणी ही महाराष्ट्राची वीरकन्या, महाराष्ट्राच्या अस्मितेवर नशेच्या अंमलात गुळण्या टाकणाऱ्या कोणी स्वत:ला झाशीची राणी समजत असेल, आणि राजकीय पक्ष झाशीच्या राणीचा अपमान करणार असेल, तर राजकारण किती तळाला नेलंय हे स्पष्ट दिसतंय, असेही संजय राऊत म्हणाले.