Aditya Thackeray's idea is very expensive; The cost of one day's maintenance of a penguin is equal to one worker's monthly salary

पुढील 3 वर्षांसाठी पालिका 15 कोटी रुपये एकूण 7 पेंग्विन वर खर्च केला जाणार आहे. त्यासाठी पालिकेने 15 कोटींची सुधारित निविदा काढली असून प्रत्येक वर्षी 5 कोटी रुपये खर्च केले जाणार. 2018 मध्ये तीन वर्षाचा देखभालीचा करार हा 11 कोटीचा करण्यात आला होता. तो आता संपत आहे.

    मुंबई : पेंग्विनवर पुढील तीन वर्षासाठी 15 कोटींचा खर्च केला जाणार आहे. पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे ही निविदा रद्द करण्याची मागणी पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.

    पुढील 3 वर्षांसाठी पालिका 15 कोटी रुपये एकूण 7 पेंग्विन वर खर्च केला जाणार आहे. त्यासाठी पालिकेने 15 कोटींची सुधारित निविदा काढली असून प्रत्येक वर्षी 5 कोटी रुपये खर्च केले जाणार. 2018 मध्ये तीन वर्षाचा देखभालीचा करार हा 11 कोटीचा करण्यात आला होता. तो आता संपत आहे.

    पेंग्विन हे कंत्राटदारासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. कंत्राटदाराला फायदा व्हायला पाहिजे यासाठी टेंडर काढण्यात आले आहे. राणीबागेतील आपले डॉक्टर आणि कर्मचारी परदेशातून आणल्या जाणाऱ्या पक्षी आणि प्राण्यांना कसे सांभाळायचे आहे हे गेल्या तीन वर्षांत शिकले आहेत. कोरोना काळात पालिकेची आर्थिक परिस्थिती वाईट झाली आहे. अशावेळी 15 कोटींचे टेंडर कशासाठी, असा सवाल पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. पेंग्विनच्या देखभालीसाठी काढण्यात आलेलं टेंडर रद्द करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. राणीबागेत संचालक आहेत त्या ठिकाणी परदेशातून संचालक मागवावेत असा टोला रवी राजा यांनी लगावला आहे.

    शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख व सध्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पेंग्विन आणण्यात आले. त्यासाठी वातावरण निर्मिती करण्यात आली. त्यानंतर एका पेंग्विनचा मृत्यू झाला त्यावेळीही राजकारण करण्यात आले. पेंग्विनमुळे पालिकेचे उत्पन्न वाढत असून खर्चही वाढत आहे. पेंग्विनमुळे मुंबईची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पेंग्विनवर मोठ्या प्रमाणात खर्च होतोय असे विरोधकांना वाटत असेल तर त्यावर नक्की तोडगा काढला जाईल मात्र पेंग्विनवर तडजोड होणार नाही.

    - महापौर किशोरी पेडणेकर