…पण मी त्यांचे नाव घेवू शकत नाही; कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट

कार्डेलिया क्रूझवर छापा प्रकरणात(Cardelia Cruise Drugs case) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक(Nawab malik) यांनी दोन एनसीबीच्या छाप्यात भाजपशी संबंधित व्यक्ती होत्या याची चित्रफीत दाखवली त्यानंतर शनिवारी पुन्हा पत्रकार परिषद घेत भाजपचा या छाप्यांशी संबंध असल्याचा आरोप केला.  त्यावर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देत गौप्यस्फोट केला आहे.

    नागपूर : कार्डेलिया क्रूझवर छापा प्रकरणात(Cardelia Cruise Drugs case) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक(Nawab malik) यांनी दोन एनसीबीच्या छाप्यात भाजपशी संबंधित व्यक्ती होत्या याची चित्रफीत दाखवली त्यानंतर शनिवारी पुन्हा पत्रकार परिषद घेत भाजपचा या छाप्यांशी संबंध असल्याचा आरोप केला.  त्यावर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देत गौप्यस्फोट केला आहे.

    ड्रग्स पार्टीत पकडलेल्या काही जणांना सोडून देण्यात आल्याच्या मलिक यांच्या आरोपाबाबत फडणवीस म्हणाले की,. या मध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या जवळच्या व्यक्तीला देखील सोडण्यात आले आहे. ते म्हणाले की, मी त्याचे नाव घेऊ शकत नाही.

    फडणवीस  यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले की, एनसीबीने छापा टाकत अनेकांना पकडले. पण या मध्ये ज्यांचा काही संबंध नव्हता आशांना सोडून देण्यात आले. काही लोकांकडे काही गोष्टी सापडल्या त्यांना एनसीबीने अटक केली. ड्रग्स ही समाजाला लागलेली कीड आहे. आशा गोष्टी च्या विराधोत जर एखादी संस्था काम करत असेल तर त्या यंत्रणेच्या मागे उभे राहणे आवश्यक आहे. पण या प्रकरणात राजकरण केल्याचे दिसत आहे.