Cardelia Cruise Drugs Case Aryan Khan on biscuits only for four days; Prison officials are also concerned

क्रूझ ड्रग्स प्रकरणी(Cardelia Cruise Drugs Case) अटकेत असलेल्या आर्यन खानला(Aryan Khan Drugs Case) कारागृहातील कडक नियमांना सामोरे जावे लागत असून त्याचे खाण्या­-पिण्यावरून मन उडाले आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्याने केवळ बिस्टिकेच खाल्ली आहेत. त्याच्या या वर्तणुकीमुळे आता कारागृह अधिकारीही चिंतेत असून त्याच्यावर २४ तास ‘वॉच’ ठेवला जात असल्याची माहिती मिळाली आहे.

    मुंबई : क्रूझ ड्रग्स प्रकरणी(Cardelia Cruise Drugs Case) अटकेत असलेल्या आर्यन खानला(Aryan Khan Drugs Case) कारागृहातील कडक नियमांना सामोरे जावे लागत असून त्याचे खाण्या­-पिण्यावरून मन उडाले आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्याने केवळ बिस्टिकेच खाल्ली आहेत. त्याच्या या वर्तणुकीमुळे आता कारागृह अधिकारीही चिंतेत असून त्याच्यावर २४ तास ‘वॉच’ ठेवला जात असल्याची माहिती मिळाली आहे.

    ८ ऑक्टोबरला दुपारी आर्थर रोड कारागृहात आर्यन खानची रवानगी करण्यात आली. गेल्या पाच दिवसांपासून त्याने केवळ बिस्किटेच घेतली आहेत. कारागृहात येताना त्याने सुमारे डझनभर पाण्याच्या बाटल्या खरेदी केल्या होत्या, त्यापैकी आता केवळ २ ते ३ बाटल्या उरल्या आहेत. कारागृहातील जेवन ते नाहीच, पण इतक्या दिवसात साधे शौचालयालाही गेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहाच्या नियमांनुसार त्याला दर दिवसाला शेविंग करावी लागत आहे.

    आर्यनला कितीही समजावले तरीही ‘भूख लागली नाही’, हे कारण देत जेवणाला नकार देत असल्याचे समजते. त्यामुळे त्याच्या आरोग्याबाबत कारागृह अधिकारी चिंतेत असल्याचे समजते. कारागृह सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्यनवर तीन जण २४ तास नजर ठेवतात. यामध्ये वॉर्डमधील एक कैद्याचाही समावेश आहे. जो कैदी आर्यनवर नजर ठेवत आहे, त्याने चेंबूर बँकमध्ये २१ वर्षांपूर्वी चोरी केली होती. या कैद्याला ‘जवाबदार’ देखील संबोधले जाते. या जवाबदाराचे काम आपल्या सहकारी कैद्यावर नजर ठेवण्याचे असते. दरम्यान, आर्यनच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

    सुत्रांच्या माहितीनुसार, आर्यन खानसोबत शाहरुख आणि गौरीचा काहीही संपर्क होऊ शकत नाही आहे. पण शाहरुख अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून आर्यनच्या तब्येतीची चौकशी करत करत असतो.