Cardelia Cruise Drugs Case: Witness Who Selfie With Aryan Khan Revealed Crime filed in Pune, Palghar

क्रुझ रेव्ह पार्टी(Cardelia Cruise Drugs Case) प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसोबत (Aryan Khan Drugs Case) एनसीबीच्या कार्यालयात सेल्फी घेतल्यानंतर व्हायरल झालेल्या फोटोमुळे चर्चेत आलेला किरण गोस्वामीचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला ‘कारनामा’ समोर आला आहे. त्याच्याविरोधात पुणे पोलीस ठाण्यात परदेशात नोकरी मिळवून देण्याची बतावणी करून फसवणूक केल्याचे नवीन प्रकरण समोर आले आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकरणात त्याच्यावर कारवाई झाली नाही. तो पोलिसांचा खबरी आहे, असे बोलले जात आहे.

  पालघर : क्रुझ रेव्ह पार्टी(Cardelia Cruise Drugs Case) प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसोबत (Aryan Khan Drugs Case) एनसीबीच्या कार्यालयात सेल्फी घेतल्यानंतर व्हायरल झालेल्या फोटोमुळे चर्चेत आलेला किरण गोस्वामीचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला ‘कारनामा’ समोर आला आहे. त्याच्याविरोधात पुणे पोलीस ठाण्यात परदेशात नोकरी मिळवून देण्याची बतावणी करून फसवणूक केल्याचे नवीन प्रकरण समोर आले आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकरणात त्याच्यावर कारवाई झाली नाही. तो पोलिसांचा खबरी आहे, असे बोलले जात आहे.

  आर्यन खान ड्रग्जच्या प्रकरणामध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवले आहे. हाच साक्षीदार गोसावी याने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात कामाला लावतो, असे सांगून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. पुणे पाठोपाठ पालघरमधील तरुणांनाही त्याने परदेशात नोकरी देतो, असे सांगून गंडा घातला आहे.

  नवी मुंबई येथील के. पी. इंटरप्राईज या कार्यालयातून तो हे फसवणुकीची रॅकेट चालवत होता, असे उत्कर्षने सांगितले. दोन दिवसांपूर्वी उत्कर्ष याने आर्यन खान प्रकरणात टीव्हीवर सुरू असलेल्या बातम्या पहिल्या व आर्यनसोबत सेल्फी असलेला किरण गोसावी याच व्यक्तीने आपली फसवणूक केल्याचे उत्कर्षला समजले. दोन-तीन वर्षांपूर्वी उत्कर्ष व त्याचा भाऊ आदर्श नोकरीच्या शोधात असताना किरण गोसावी याची सुरुवातीला फेसबुक वरून मैत्री झाली.

  उत्कर्ष व आदर्श याला मलेशियाला कामाला लावतो, असे सांगितल्यानंतर दोघांकडून गोसावी याने दीड लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार दोघांनीही गोसावी यांच्या के. पी. इंटरप्राईज या बँक खात्यात पैसे दिले. त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचे तिकीट व विजा दिला.
  कोचिन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचे तिकीट व विजा बोगस असल्याचे कळाल्यानंतर या दोघांनाही शॉक बसला. इथून ते पालघर येथे आले व पालघर येथे आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत या प्रकरणी त्यांनी केळवा पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र केवळ पोलिसांनी त्याची तक्रार घेतली नाही. म्हणून दोघांनीही तक्रार अर्ज दाखल केला.

  पालघर तालुक्यातील एडवण या गावातील उत्कर्ष तरे व आदर्श किणी या दोन तरुणांचीही त्याने दोन वर्षे आधी फसवणूक केली होती. या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो, असे सांगून त्यांच्याकडून दीड लाख रुपये गोसावी याने उकळली असल्याचे उत्कर्षने बोलताना सांगितले.

  दोन वर्षे उलटूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे उत्कर्ष याने सांगितले आहे. गोसावी याने माझ्यासारख्या अनेक तरुणांची फसवणूक केल्याची दाट शक्यता असल्याचे उत्कर्ष याने सांगितले असून आमच्या फसवणूक प्रकरणांमध्ये किरण गोसावी याला पोलिसांनी पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा, असे सांगितले.