काेराेना लसीकरण डेडलाईन: ३१ मे पर्यंत लसीकरणाचे काम पूर्ण हाेणार!

मुंबईत सध्या काेराेना लसीकरण माेहिमेच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील काम युध्दपातळीवर सुरु आहे. काेराेना लसीकरण माेहिमेचे काम पूर्ण करण्याकरीता आता पालिका प्रशासनाकडून डेडलाइन ठरविण्यात आली असून या डेडलाईननुसार, येत्या ३१ मे २०२१ पर्यंत लसीकरणाचे काम पूर्ण हाेणार असल्याचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

  नीता परब
  मुंबई (Mumbai).  मुंबईत सध्या काेराेना लसीकरण माेहिमेच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील काम युध्दपातळीवर सुरु आहे. काेराेना लसीकरण माेहिमेचे काम पूर्ण करण्याकरीता आता पालिका प्रशासनाकडून डेडलाइन ठरविण्यात आली असून या डेडलाईननुसार, येत्या ३१ मे २०२१ पर्यंत लसीकरणाचे काम पूर्ण हाेणार असल्याचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मान्सूनपूर्वी काम पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाचे असून यासाठी प्रशासन नाना-विध प्रयत्न करत आहे.

  मुंबईत आतापर्यंत पालिका प्रशासनाने ६ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना काेराेना लस देण्यात आली आहे. यात आराेग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स, ६० वर्ष व ४५ वर्षापुढील जाेखमीचे आजार असलेल्या नागरिकांचा समावेश आहे. मुंबई सह राज्यात काेराेना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला १६ जानेवारी २०२१ मध्ये सुरुवात झाली, त्यानंतर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात ४ फेब्रुवारी व तिसऱ्या टप्प्याची सुरुवात १ मार्चला झाली.

  पहिल्या टप्प्यात आराेग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर्स यांना लसीकरण माेहिमेत सहभागी करण्यात आले. तर तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षापेक्षा अधिक व ४५ वर्षापुढील जाेखमीचे आजार असलेल्या नागरिकांचा समावेश करण्यात आला. सध्या पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेचे काम एकत्रित सुरु आहे.

  लसीकरणाची अंतिम डेडलाईन ३१ मे
  पािलका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले की,‘‘काेराेना लसीकरणासाठी ४ लाख १० हजार आराेग्य कर्मचाऱ्यांनी व फ्रंट लाईन वर्कर्स यांनी आपल्या नावाची नाेंदणी केली हाेती. यापैकी ६० टक्के आराेग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर्स यांनी काेराेना लस घेतली आहे. तर तीनही टप्प्यातील पात्र लाभार्थींचा पहिला डाेस १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचा लक्ष्य आहे.

  दुसरा डाेस ३१ मे पर्यंत मान्सूनपूर्वी पूर्ण करण्याचा पािलका प्रशासनाचे लक्ष्य आहे. तर येत्या काही दिवसात लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. सध्या मुंबईत ८९ लसीकरण केंद्र आहेत या केंद्रामध्ये वाढ केली जाणार असून १२५ केंद्र नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहेत यािशवाय येत्या काही दिवसात २५ खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरु केली जाणार आहेत.