काेराेनाचा पहिला रुग्ण अद्यापही लसीविना; अजूनही हे कुटुंब घराबाहेर निघत नाही

मागील वर्षी ११ मार्चला मुंबईत काेराेनाचा पहिला रुग्ण सापडला हाेता. रुग्ण व त्याचे कुटुंबिय दुबईला फिरण्यास गेले हाेते, या कुटुंबाबराेबर पुण्यातील ही काही मित्र परिवार हाेता त्यापैकीही काही जण पाॅिझटिव्ह आढळून आले हाेते. तर मुंबईतील अंधेरी येथे राहत असलेले हे दाम्पत्य दुबईवरुन आल्यानंतर कस्तुरबा रुग्णालयात चाचणीसाठी स्थानिक आराेग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

  मुंबई : ११ मार्च २०२० मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता.  मागील वर्षभरात या रुग्णाच्या कुटुंबियांनी विविध अडचणींचा सामना केला आहे. अजूनही हे कुटुंब घराबाहेर निघत नसून बाहेरील समाजामध्ये वावरत नसल्याचेही समाेर आले आहे. हे कुटुंब स्वत:ची काळजी घेत असले तरीही अद्याप या कुटुंबियांनी काेराेना लस घेतली नाहीये, ज्यामुळे पालिका प्रशासनाला या कुटुंबाचा विसर पडला की काय? असा सवाल केला जात आहे.

  मागील वर्षी ११ मार्चला मुंबईत काेराेनाचा पहिला रुग्ण सापडला हाेता. रुग्ण व त्याचे कुटुंबिय दुबईला फिरण्यास गेले हाेते, या कुटुंबाबराेबर पुण्यातील ही काही मित्र परिवार हाेता त्यापैकीही काही जण पाॅिझटिव्ह आढळून आले हाेते. तर मुंबईतील अंधेरी येथे राहत असलेले हे दाम्पत्य दुबईवरुन आल्यानंतर कस्तुरबा रुग्णालयात चाचणीसाठी स्थानिक आराेग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

  या चाचणीमध्ये पती-पत्नी पाॅिझटिव्ह असल्याचे समाेर आले व मुंबईत एकच खळबळ उडाली. त्यानंतर या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या अनेकांची काेराेना चाचणी करण्यात आली.  ज्यात काही जण पाॅिझटिव्ह आढळून आले.

  या घटनेनंतर अवघ्या आठवड्याभरानंतर मुंबईत २२ मार्चला एक दिवसाचा जनता कफ्यू घाेषित करण्यात आला. तर दुसऱ्या दिवसापासून २१ दिवसाचे व नंतर टप्पाटप्प्याने लाॅकडाउन सुरु झाले. जुलै महिन्यानंतर लाॅकडाऊन िशथिल करुन नागरिकांसाठी काही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या.

  पण, अद्यापही काेराेनाचे भय संपले नाहीये. पुन्हा वर्षभराने काेराेना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत आहे. १ ते ८ मार्च २०२१ दरम्यान, मुंबई सह राज्यात काेराेनाने पुन्हा डाेके वर काढले आहे. दुसरीकडे, १६ जानेवारीपासून काेराेना लसीकरण माेहिम सुरु करण्यात आले आहे. या लसीकरणाचा पहिला, दुसरा व तिसरा टप्पा सध्या एकत्रित सुरु अाहे. पण तरीही रुग्णसंख्येत वाढ हाेत असल्याचे दिसून येत आहे.

  वर्षभरापासून अडचणींचा ससेमिरा !

  अंधेरीत राहत असलेला मुंबईतील काेराेनाचा पहिला रुग्णाने अद्यापही लस घेतली नाही, आम्ही आमची घरच्या घरी काळजी घेत आहाेत. आम्ही ठिक आहाेत. आम्हाला काही हवे नकाे ते आम्ही बाहेरुन मागवून घेत आहाेत असे रुग्णाच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. तसेच आम्ही अजून लस घेतली नसल्याचेही या कुटुंबियांचे म्हणणे आहे. मागील वर्षभरापासून या कुटुंबियांनी विविध अडचणींचा सामनाही केला आहे. काेराेनाची लागण झाल्यानंतर समाजाचा बघण्याचा दृष्टिकाेन काहीशा बदला असल्याचेही खंत व्यक्त केली जात आहे. या दांम्पत्याला काेणाचा फाेन आला तरीही खटकत असल्याचेही दिसून आले. काेराेना महामारीमधून आपण बाहेर निघणे येत्या काही महिन्यात शक्य हाेईल पण पुन्हा समाजात वावरताना अवघड जाणार असल्याचे दु:ख त्यांनी यावेळी बाेलून दाखवले.