माजी महापौर श्रद्धा जाधवांसह सात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल: अटकेसाठी भाजपचा ठिय्या

भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्या प्रकरणी अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर माहिम पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात माजी महापौर श्रद्धा जाधव, राजू पाटणकर, संजय देवळेकर, अक्षय तामोरे, चंदू झगडे, राकेश देशमुख आणि शकी फडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  मुंबई : शिवसेना भवना बाहेर झालेल्या भाजप-सेना कार्यकर्त्यामधील भांडण आता पोलीस ठाण्यात पोहोचले असून भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह ७ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने काढलेल्या फटकार मोर्चात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने भिडले.

  बाळासाहेबांची शिवसेना नाही तर सोनियांची

  या प्रकरणी भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह ७ शिवसैनिकांवर माहिम पोलीसांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले. अक्षता तेंडुलकर यांनी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना नाही तर सोनियांची सेना झाली, अशी टीका केली.

  भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्या प्रकरणी अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर माहिम पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात माजी महापौर श्रद्धा जाधव, राजू पाटणकर, संजय देवळेकर, अक्षय तामोरे, चंदू झगडे, राकेश देशमुख आणि शकी फडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  शिवसैनिकांनी मागून येऊन हल्ला केला

  तक्रारीत म्हटले आहे की, आंदोलन संपल्यानंतर आम्ही परत निघालो असताना काही शिवसैनिकांनी मागून येऊन हल्ला केला. आमदार सदा सरवणकर, श्रद्धा जाधव यांच्या सांगण्यावरुन शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप अक्षता तेंडुलकर यांनी केला. आम्हाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाणीच्या वेळी श्रद्धा जाधव तिथे पोहोचल्या. त्यांनी शिवसैनिकापेक्षा आधी महिला म्हणून माझा विचार केला पाहिजे होतो.

  त्यांनी आम्हाला होणारी मारहाण रोखली पाहिजे होती, अशा शब्दात अक्षता तेंडुलकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. शिवसैनिकांनी भाजप युवा मोर्चाचे विलास आंबेकर, सनी साठे, ऋषी शेळमकर यांच्यावर हल्ला केला. त्यांना मारहाणही करण्यात आली. शिवसैनिकांनी आपल्यावर-एका महिलेवर हात उचलला, ही शिवसेना नव्हे, ही तर खिल्जीसेना आहे, यांचे कसले हिंदुत्व अशी टिका अक्षता तेंडुलकर यांनी केली