प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नाशिक येथे जात पंचायतीने उकळत्या तेलात महिलेचा हात बुडवून सत्वपरिक्षा देण्यास भाग पाडण्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. चारित्र्य संशयावरून उकळत्या तेलामध्ये महिलेचा हात बुडवून, जातपंचायतीने महिलेची अग्निपरीक्षा घेणे, त्यामुळे हा प्रकार महाराष्ट्रासारख्या पूरोगामीत्वाचे ढोल पिटणाऱ्या राज्याला हे शोभा देणारा नाही अशी खंत दरेकर यांनी व्यक्त केली आहे.

    मुंबई (Mumbai). राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नाशिक येथे जात पंचायतीने उकळत्या तेलात महिलेचा हात बुडवून सत्वपरिक्षा देण्यास भाग पाडण्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. चारित्र्य संशयावरून उकळत्या तेलामध्ये महिलेचा हात बुडवून, जातपंचायतीने महिलेची अग्निपरीक्षा घेणे, त्यामुळे हा प्रकार महाराष्ट्रासारख्या पूरोगामीत्वाचे ढोल पिटणाऱ्या राज्याला हे शोभा देणारा नाही अशी खंत दरेकर यांनी व्यक्त केली आहे.

    संबाधितांवर कारवाई करा (Take action against those involved)
    प्रविण दरेकर म्हणाले की, गेल्या महिन्यात पुण्यामध्ये अशा प्रकारचे जातपंचायतीचे महिलेच्या बाबतीत प्रकार केला होता. तो आवाज उठवत भाजपाने कडक कारवाई करण्यास भाग पाडले होत. ते म्हणाले की, हा प्रकार माणुसकीला काळिमा लावणारा आहे.  त्यामुळे या प्रकरणी देखील तात्काळ सर्व जातपंचायतीच्या लोकांची, प्रमुखांची, संबाधितांची चौकशी करत कठोर कारवाई केली पाहिजे अशी भाजपची मागणी आहे.

    कायद्याची कठोर अंमलबजावणी करा (Strictly enforce the law)
    दरेकर म्हणाले की, जातपंचायतीच्या संदर्भात अस्तित्वात असणारा कायद्याची कठोर अंमलबजावणी करत, आणखी काही कठोरता आवश्यक असल्यास राज्य सरकारने पाहणी करावी. वारंवार अशा प्रकार चे प्रकार घडत आहे विशेतः ग्रामीण भागात ते थांबवण्याच काम राज्य सरकारने तात्काळ करावे. किंबहुना असे प्रकार राज्यभर वाढत राहतील नाहीतर अशा प्रकारची कृत्य घडत राहतील असा इशाराही दरेकर यांनी दिला.