वांद्रे परिसरात ‘कॅट किलर’ची दहशत; आरोपीवर ५० हजारांचे बक्षीस

वांद्रे पोलिसांनी सहा मांजरींची हत्या करणाऱ्या अज्ञात ‘सीरियल किलर’ विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला आहे. २४ मार्चपासून आतापर्यंत त्याने सहा मांजरींची हत्या केली आहे. वांद्रे परिसरात ‘कॅट किलर’ फिरत असून या आरोपीला पकडण्यासाठी ५० हजारांचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे.

    मुंबई : वांद्रे पोलिसांनी सहा मांजरींची हत्या करणाऱ्या अज्ञात ‘सीरियल किलर’ विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला आहे. २४ मार्चपासून आतापर्यंत त्याने सहा मांजरींची हत्या केली आहे. वांद्रे परिसरात ‘कॅट किलर’ फिरत असून या आरोपीला पकडण्यासाठी ५० हजारांचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अनेकजण मांजर, कुत्रासारखे पाळीव प्राण्यांचे लालन-पालन करत असतात. पंरतु, वांद्रे परिसरात धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वांद्रेत रहस्यमय हत्याऱ्याची दहशत पसरली आहे. काही माजरींची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यांचे जबडे उखडण्यात आले आहेत. वांद्रे पोलिसांनी या मांजरीच्या हत्याऱ्याचा शोध सुरु केला आहे.

    वांद्रे पश्चिम येथील पेरी क्रॉस रोडवरील निवासी डॉ. ज्योत्सना चंगरानी यांनी सांगितले की, त्या गेल्या १० वर्षांपासून रस्त्यावरील प्राण्यांना अन्नदान करत आहेत. त्यांना सहा मांजरीचे जबडे आणि तोंडावर जाणूनबुजून वार केल्याचे आढळून आले. लॉकडाऊन काळात श्याम केवटे (४०) यांनीही मांजरीला कोणीतरी क्रुरतेने मारल्याचे पाहिले. स्थानिकांनी तिला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. दुसरी घटना त्याच दिवशी घडली. तर तिसरी घटना १८ एप्रिलला समोर आली.