अनिल देशमुख क्लिनचीट प्रकरण : CBI अधिकारी अभिषेक तिवारी व वकील आनंद डागा यांचा जामीनासाठी दिल्ली न्यायालयात अर्ज

अनिल देशमुख यांना शंभर कोटी वसुली प्रकरणात क्लिनचीट देण्यासाठी लाच घेणारे सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी व वकील आनंद डागा यांना सीबीआयने ताब्यात घेतले. त्यानंतर आता या दोघांनी जामीनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यामुळे आता जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देते हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

    राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना शंभर कोटी वसुली प्रकरणात क्लिनचीट देण्यासाठी लाच घेणारे सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी व वकील आनंद डागा यांना सीबीआयने ताब्यात घेतले. त्यानंतर आता या दोघांनी जामीनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यामुळे आता जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देते हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

    नेमकं काय घडलं?

    अनिल देशमुख यांना शंभर कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने क्लिनचीट दिली. मात्र, हा चौकशी अहवाल माध्यमांत लीक झाल्याने त्यांच्याच एका अधिकाऱ्याला अटक केली आहे. अंतर्गत चौकशीची कागदपत्रे CBI च्याच एका अधिकाऱ्याने लीक केल्याने पुन्हा एकदा सीबीआयच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

    सीबीआयने अटक केलेल्या अधिकाऱ्याचं नाव अभिषेक तिवारी असून ते CBI चे उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. इंडिया टुडेच्या बातमीनुसार अभिषेक तिवारी हे देशमुखांच्या वकिलाच्या संपर्कात होते. त्यांनी देशमुख यांच्या जवळच्या लोकांकडून लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

    दरम्यान, याआधी बुधवारी रात्री अनिल देशमुख यांचे जावई डॉक्टर गौरव चतुर्वेदी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. 20 मीनिटे त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांची सुटका केली. देशमुखांचे जावई चतुर्वेदी हे वरळीतील सुखदा या इमारतीमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयने ताब्यात घेतलं. त्यानंतर देशमुखांच्या वकीलांच्या टीम मधील आनंद डागा डागा यांनाही सीबीआयने ताब्यात घेतलं.