सीबीआयचा लीक झालेला ‘तो’ अहवाल खराच; राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याचा दावा

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लीक झालेला अहवाल खरा असल्याचं म्हटलं आहे. अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे पुर्णत: खोटे आहेत. या लीक झालेल्या अहवालाने हे सिद्ध केल्याचंही नवाब मलिक हे म्हणाले आहेत. केंद्र सरकार आपली मर्यादा ओलांडत आहे. हा लीक झालेला अहवाल न्यायालयात दाखल केला असता तर अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला असता. केंद्र सरकाने मुद्दाम हा अहवाल दाखल केला नाही, अशी टीका नवाब मलिक यांना केेंद्र सरकारवर केली आहे.

    मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या राजकारणाचा विषय बनले आहेत. गृहमंत्री असताना केलेल्या कथित घोटाळा प्रकरणी त्यांची सध्या सीबीआय चौकशी चालू आहे. सीबीआय आणि ईडी या दोन केंद्रीय तपास यंत्रंणा त्यांचा तपास करत आहेत. मु्ंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणीचे आरोप केले होते.

    सीबीआयच्या प्राथमिक अहवालात अनिल देशमुख हे निर्दोष असल्याचं पुढं आलं होतं. तो अहवाल लीक झाल्यानं सीबीआयवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. सीबीआयच्या या अहवालावरून महाराष्ट्राचं राजकारण चांगलचं तापलं आहे.

    दरम्यान त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लीक झालेला अहवाल खरा असल्याचं म्हटलं आहे. अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे पुर्णत: खोटे आहेत. या लीक झालेल्या अहवालाने हे सिद्ध केल्याचंही नवाब मलिक हे म्हणाले आहेत. केंद्र सरकार आपली मर्यादा ओलांडत आहे. हा लीक झालेला अहवाल न्यायालयात दाखल केला असता तर अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला असता. केंद्र सरकाने मुद्दाम हा अहवाल दाखल केला नाही, अशी टीका नवाब मलिक यांना केेंद्र सरकारवर केली आहे.

    वकिलांना सीबीआयने विना नोटिस ताब्य़ात घेेणे हे चुकीचं

    तसेचं सीबीआय करत असलेली कार्यवाही ही सुडबुद्धीची आहे. अनिल देशमुख यांच्या कूटुंबाला त्रास देणं हे योग्य नाही, असंही नवाब मलिक हे म्हणाले आहेत. अनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयने विना नोटिस ताब्य़ात घेेणे हे चुकीचं असल्याचं नवाब मलिक हे यावेळी म्हणाले आहेत. अनिल देशमुख यांच्याविरोधात आलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने सीबीआयला तपासाचे आदेश दिले होते.