CCTV footage of explosives found near Ambani's house in police hands; A man wearing a PPE kit was seen near a Scorpio car

गाडी पार्क केल्यापासून सकाळपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जमा केले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक स्कॉर्पिओ आणि एक इनोव्हा कार दिसून आली होती. हीच इनोव्हा कार स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओचा पाठलाग करत होती. पीपीई किट घातलेली व्यक्ती कार ड्रायव्हर असेल असा संशय व्यक्त केला जात आहे.

    मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर अज्ञात स्कॉर्पिओ आढळून आली, तसेच येथे स्फोटकासाठी वापरण्यात येणाऱ्या जेलिटन काड्याही सापडल्याने खळबळ उडाली होती. यानंतर तपासात मुंबई पोलिसांनी काही खुलासे केले आहेत. येथील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. या फुटेजमध्ये स्कॉर्पिओ कारजवळ PPE किट घातलेली व्यक्ती दिसत आहे.

    गाडी पार्क केल्यापासून सकाळपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जमा केले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक स्कॉर्पिओ आणि एक इनोव्हा कार दिसून आली होती. हीच इनोव्हा कार स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओचा पाठलाग करत होती. पीपीई किट घातलेली व्यक्ती कार ड्रायव्हर असेल असा संशय व्यक्त केला जात आहे.

    दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ज्या कारमध्ये स्फोटके सापडली होती, ती चोरीची असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. मनसुख हिरेन या कारचे मालक होते. त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी शुक्रवारी दुपारी नौपाडा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांचा शुक्रवारी अचानक मृतदेह आढळल्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथका (एटीएस) नव्याने युद्धपातळीवर तपास सुरू केला.