CCTV footage of Mumbaikars falling asleep The young man was stabbed all day; This kind of thing happened on the bridge of Kurla station, not UP Bihar; Watch the video

मुंबई : कुर्ला स्टेशनच्या ब्रीजवरील एक धक्कादायक CCTV फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये एका तरुणावर चाकू हल्ला केल्याचे दिसत आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईतील कुर्ला स्थानकाच्या पादचारी पुलावर २८ नोव्हेंबर रोजी घडलेला हा शनिवारी दुपारी घडलेला हा थराराक प्रकार येथील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

फय्याज नेनपुरवाला असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरून तो पलीकडे जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोराचा चेहरा कपड्याने झाकलेला असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. हल्लेखोराने फय्याजच्या पोटावर चाकूने दोनवेळा वार केले. त्यानंतर तो तेथून कसाईवाडा परिसराच्या दिशेने पळून गेला.

फय्याजकडे पैसे असूनही हल्लेखोराने त्याच्याकडील पैसे लुटण्याचा प्रयत्न केला नाही. यामुळे फय्याजची हत्या करण्याच्या किंवा त्याला गंभीर जखमी करण्याच्या उद्देशानेच हा हल्ला झाला असावा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.