गुढीपाडवा अत्यंत साधेपणाने साजरा करा; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जनतेला आवाहन

    मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. दरम्यान अशा परिस्थितीत गुढीपाढवा हा सण जवळ आला आहे. याचं पार्शवभूमीवर हा सण सर्वांनी साधेपणाने साजरा करावा असे आवाहन राज्यापालांनी केले आहे.

    गुढीपाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच संपूर्ण देश, विशेषतः महाराष्ट्र, करोनाच्या गंभीर संकटातून जात आहे. त्यामुळे गुढी पाडव्याचा मंगल सण यंदा आपापल्या घरीच अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन करतो. हा सण तसेच आगामी नवे वर्ष सर्वांकरीता सुख, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो अशा शब्दात राज्यपाल कोश्यारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. देतो.

    तसेचं युगादी, चेती चाँद, बैसाखी तसेच सौसर पाडवो निमित्‍ताने देखील मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.