विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम आयोजित करुन साजरा

नगरसेविका आसावरी पाटील यांनी आयोजित केलेल्या गरीब व गरजू महिलाना आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात आले. भरत घाणेकर यांनी फुलपाखरु येथे वाढदिवस साजरा केला. वॉर्ड क्रमांक २५ येथे जानूपाडामधील पांडे कंपाऊंड रिद्धीसिद्धी सोसायटी येथे लादीकरणाचे उद्घाटन दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वॉर्ड क्रमांक २५ जानूपाडा येथील  रस्त्याचे उद्घाटनही दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

    मुंबई – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सुरुवात वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवार, १२ ऑक्टोबर रोजी वरळी येथे पप्पू पवार यांच्यावतीने आयोजित ५२ दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर वाटप करून झाली. तसेच १३ ऑक्टोबर रोजी सकाळी आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  आजी – आजोबा उद्यान येथे जेष्ठ नागरिकांचा सत्कार केला गेला. दहिसर येथील ज्ञानेश्वरी ग्रंथालय येथे सफाई कामगारांचा सन्मान केला. मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक ३ येथे दरेकर यांच्या हस्ते गरजू महिलांना साडीवाटप करण्यात आले. तसेच सफाई कामगारांचा सन्मान केला व त्यांना धान्यवाटप करण्यात आले. बोरिवली येथील वॉर्ड क्रमांक ४ रावळपाडा येथे दरेकर यांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांचा सत्कार केला गेला. तसेच प्रविण दरेकर यांच्या प्रयत्नांतून तयार केल्या गेलेल्या वैशालीनगर संकुल येथील प्रवेशद्वाराचे त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

    स्वर्गीय प्रदीप दरेकर अभ्यासिका येथे दरेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी दरेकर यांच्या हस्ते अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या मुलांचा सत्कार करण्यात आला तसेच त्या विद्यार्थ्यानीही दरेकर यांचा सत्कार केला. वॉर्ड क्रमांक ११ काजूपाडा येथे जेष्ठ नागरिकांचा सत्कार केला व त्यांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच वॉर्ड क्रमांक १२ देवीपाडा येथे विकी चोगुले यांनी आयोजित केलेला गरीब व गरजू महिलाना कांबळ वाटपाचा कार्यक्रम प्रविण दरेकर यांच्या हस्ते पार पडला. नगरसेविका आसावरी पाटील यांनी आयोजित केलेल्या गरीब व गरजू महिलाना आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात आले. भरत घाणेकर यांनी फुलपाखरु येथे वाढदिवस साजरा केला. वॉर्ड क्रमांक २५ येथे जानूपाडामधील पांडे कंपाऊंड रिद्धीसिद्धी सोसायटी येथे लादीकरणाचे उद्घाटन दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वॉर्ड क्रमांक २५ जानूपाडा येथील  रस्त्याचे उद्घाटनही दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

    नगरसेविका प्रीतम पंडागळे यांच्या वॉर्ड क्रमांक २६ मधील एक गरीब गरजू नागरिकांच्या स्टॉलचे उद्घाटन दरेकर यांनी केले. तसेच सफाई कामगारांचा सन्मान करून सफाई कामगार महिलांना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नगरसेविका प्रीतम पंडागळे यांच्या विभागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन दरेकर यांनी केले. वॉर्ड क्रमांक ५ येथे गरीब व गरजू विद्यार्थी व रुग्णाना दरेकर यांनी मदत केली. तसेच यूपीएससीमध्ये यश मिळवलेल्या महिलेचा सत्कारही त्यांच्या हस्ते करण्यात आला. देविपाडा येथील सद्गुरू नगर येथील राहिवाशयांसोबतही वाढदिवस साजरा केला.