दक्षिण आफ्रिकेला हरविल्यानंतर महिला टीमचा मास्टर डान्स; व्हिडिओ व्हायरल

भारतीय महिला क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकन क्रिकेट टीमला 9 विकेटने हरवित विजयपताका रोवली आहे. एक महिला दिनाच्या औचित्यावर भारतीय महिला टीमने गाजविलेले कर्तृत्व भल्याभल्यांना थक्क करणारे आहे. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे महिला खेळाडूंनी विजयाचा आनंदोत्सव ‘वाथी कमिंग’ या टिझरवर डान्स करून साजरा केला.

  मुंबई (Mumbai).  भारतीय महिला क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकन क्रिकेट टीमला 9 विकेटने हरवित विजयपताका रोवली आहे. एक महिला दिनाच्या औचित्यावर भारतीय महिला टीमने गाजविलेले कर्तृत्व भल्याभल्यांना थक्क करणारे आहे. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे महिला खेळाडूंनी विजयाचा आनंदोत्सव ‘वाथी कमिंग’ या टिझरवर डान्स करून साजरा केला. सोशल मीडियावर डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

  भारतीय महिला टीमने मालिकेत पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव केला. या विजयानंतर भारतीय टीममध्ये आनंदाचे वातावरण आहे. भारतीय खेळाडूंनी तामिळ सुपरस्टार विजय याच्या मास्टर सिनेमातील ‘वाथी कमिंग’ या टिझरवर जोरदार डान्स केला आहे. त्यांचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  वेदा कृष्णमूर्ती आकांक्षा कोहली व्हीआर वनिता आणि ममता माबेन या चार खेळाडूंनी हा डान्स केला आहे. वेदा कृष्णमूर्तीने तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मास्टर सिनेमातील ‘वाथी कमिंग’ हे टिझर भलतेच लोकप्रिय आहे. यापूर्वी अहमदाबादमध्ये जिममध्ये व्यायाम करत असताना आर. अश्विन, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी देखील या टिझरवर नाच केला होता. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या विजयानंतर भारतीय महिला टीमच्या खेळाडूंना देखील या गाण्यावर नाच करण्याचा मोह आवरला नाही.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Veda Murthy (@vedakrishnamurthy7)

  लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात भारताचा 9 विकेटने विजय झाला. भारताला या मॅचमध्ये विजयासाठी 158 रनचं आव्हान होतं. या आव्हानाचा पाठलाग टीमने फक्त 28.4 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून केला. स्मृती मंधाना आणि पूनम राऊत या दोघींनी अर्धशतकं केली, तर झूलन गोस्वामीने 42 रन देऊन 4 विकेट घेतल्या. राजेश्वरी गायकवाडला 3 विकेट घेण्यात यश आलं.

  भारतीय टीमच्या या विजयात स्मृती मंधानाने आक्रमक खेळी केली, सोबतच तिने विश्वविक्रमही स्वत:च्या नावावर केला. स्मृतीने 64 बॉलमध्ये नाबाद 80 रन केले, यात 3 फोर आणि 10 सिक्सचा समावेश होता. मंधानाचा स्ट्राईक रेटही 125 चा होता. तर पूनम राऊतने 89 बॉलमध्ये नाबाद 62 रनची खेळी केली. मंधानाने लागोपाठ 10व्यांदा आव्हानाचा पाठलाग करताना 50 पेक्षा जास्त रन केले आहेत. हा रेकॉर्ड करणारी ती जगातली पहिली क्रिकेटपटू आहे.