आंतरराष्ट्रीय शांती दिवसाच्या निमित्ताने २१ सप्टेंबरला होणार ‘शांतीचा उत्सव’

मुंबई : आंतरराष्ट्रीय शांती दिवस (International Peace Day)  दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी सर्व देशांमध्ये व लोकांमध्ये शांततेचा (peace) प्रसार करण्यासाठी साजरा केला जातो. येणाऱ्या पिढ्यांना आजच्यापेक्षा चांगल्या विश्वाचा वारसा मिळावा या हेतूने १९८१ साली संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nations) आंतरराष्ट्रीय शांती दिवस प्रस्थापित केला.

हार्टफुलनेस संस्था, युनायटेड नेशन्स इन्फर्मेशन सेंटर, ग्लोबल सिटिझन्स इंडिया आणि स्पिरीट ऑफ ह्युमॅनिटी फोरम यांचा सहयोग मानवतेला ध्यानाद्वारे एकत्र आणेल आणि शांतीतील सामर्थ्य अनुभवण्यास मदत करेल. याचे आयोजन विश्व शांतिदिनी ‘शांतीचा उत्सव’ या नावाच्या एका ‘नि:शुल्क नोंदणी असलेल्या व्हर्चुअल कार्यक्रमा’द्वारे भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता केले जाईल व नंतर ९वाजता ‘शांतीचे सृजन’ या नावाने समक्रमित ध्यान केले जाईल.

‘शांतीचा उत्सव’१०० हून अधिक देशात आणि २४ भाषांमधे अनुवादित होऊन http://heartfulness.org/peaceday या ऑनलाइन प्रसारण मंचांच्या सहयोगाद्वारे जगभरात प्रसारित केला जाईल. हार्टफुलनेस संस्थेने आयोजित केलेले असेच व्हर्चुअल कार्यक्रम आंतरराष्ट्रीय योग दिनी जगभरातील २२ दशलक्ष लोकांनी पाहिले. आता हा कार्यक्रम ४० दशलक्ष लोकांपर्यंत पोहचण्यास सज्ज आहे.

हार्टफुलनेस संस्थेचे मार्गदर्शक, दाजी म्हणाले, आंतरिक शांती आणि एकता अनुभवणे हे बाह्य शांती जोपासण्यातील पहिले पाऊल आहे. शांततेचा नाद एकता प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य बाळगतो आणि या वर्षी आंतरराष्ट्रीय शांतिदिनी आपण आपल्या अंत:करणातून शांतीला प्रेरणा कशी देऊ शकतो हे बघणार आहोत.

नावाजलेले अभिनेते व दिग्दर्शक शेखर कपूर, आंतरिक शांतीचे प्रख्यात समर्थक डॉक्टर कमलेश पटेल (दाजी), डॉक्टर दीपक चोप्रा, सिस्टर बी के शिवानी, डॉक्टर ब्रूस लिप्टन, मिस शॅरन सॉल्झबर्ग आणि ॲमंडीन रॉष या सर्वांमधील संवादाचे संचालन करतील. प्रसंगाचे औचित्य साधून काही प्रख्यात संगीतकार शांतीप्रित्यर्थ स्वयंसेवेच्या भावनेने या कार्यक्रमात सहभागीहोतील. शांतिदूत ॲमंडीन रॉष आपले काही अनुभव सांगतील.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी १८००-१२१-३४९२ किंवा peaceday@heartfulness.org वर ई-मेल द्वारे संपर्क साधावा.