घ्या आता बोला : सणासुदीच्या दिवसांतील गर्दीवर आवर घाला केंद्राचे राज्यांना आदेश

राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत असल्याने खबरदारिचा उपाय म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारल्याने भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. मात्र, आता केंद्र सरकारनेच सणासुदीच्या दिवसांतील गर्दीवर आवर घालण्याचे आदेश दिल्याने राज्यातील भाजपनेते काय भुमीका घेणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

    ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा व सप्टेंबर महिना सणासुदीच्या दिवसांनी भरलेला आहे. या दिवसांत येणारे दोन महत्वाचे सण म्हणजे गोकुळाष्टमी व गणपती. हे दोन्ही सण महाराष्ट्रत मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या सणासुदीच्या दिवसांत होणारी गर्दी लक्षात घेता या गर्दीला आवर घालण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यांना देण्यात आले आहेत.

    ‘तुमच्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असेल तर स्थानिक प्रशासनाने कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घ्यावा.’ असे निर्देश देखील गृहमंत्रालयाने दिले आहेत. हे आदेश केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी दिले आहेत. काही ठरावीक राज्यांतील स्थानिक पातळीवरील कोरोनाचा प्रादुर्भाव वगळता देशात कोरोना नियंत्रणात आहे.

    सध्या कोरोना बाधीतांच्या रुग्णसंखेत महाराष्ट्र वरच्या स्थानावर आहे. त्यामुळे सध्या लागू असलेली मार्गदर्शक तत्त्वे आणखी एक महिन्याने, म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंत वाढवत असल्याचे गृहमंत्रालयाने सांगीतले.

    मागील गेल्या काही दिवसांत केरळमध्ये नंतर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारचं टेन्शन वाढलं आहे. रुग्णवाढीचा दर आणि मृत्यूदर दोन्ही वाढत असल्याने तिसरी लाट आणखी भयंकर असण्याची शक्यता निती आयोगाने वर्तवली असल्याने सध्या आहेतच तेच कोरोनाचे निर्बंध पुढील महिनाभर कायम ठेवण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत.

    दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत असल्याने खबरदारिचा उपाय म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दहीहंडी उत्सवाच्या सेलिब्रेशनला परवानगी नाकारल्याने भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. मात्र, आता केंद्र सरकारनेच सणासुदीच्या दिवसांतील गर्दीवर आवर घालण्याचे आदेश दिल्याने राज्यातील भाजपनेते काय भुमीका घेणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.