आठवड्याभरात मध्य आणि पश्चिम लोकल रेल्वेने केली ‘इतकी’ कमाई

मुंबई : कोरोना विषाणूचं संकट दिवसागणिक वाढत आहे. तसेच मुंबई देखील कोरोनाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अशातच राज्य सरकारकडून मध्य आणि पश्चिम लोकल रेल्वे अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या

 मुंबई :  कोरोना विषाणूचं संकट दिवसागणिक वाढत आहे. तसेच मुंबई देखील कोरोनाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अशातच राज्य सरकारकडून मध्य आणि पश्चिम लोकल रेल्वे अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. परंतु या आठवड्याभरातच मध्य आणि पश्चिम रेल्वेने चांगली कमाई केल्याचं समजलं जात आहे. १५ जूनपासून पश्चिम रेल्वेतून तब्बल २ लाख ६२ हजार ६६७ प्रवासी लोकलने प्रवास करत आहेत. तर गेल्या सात दिवसांपासून जवळपास २३ हजार प्रवासी मध्य रेल्वेने प्रवास करत आहेत.

दरम्यान, १५ जूनपासून लोकलसेवा सुरू झाल्यापासून पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर लोकल धावत आहेत. या काळात पश्चिम रेल्वेने ४७ लाख ३६ हजार रूपयांची कमाई केली आहे. तर मध्य रेल्वेने १ कोटींची कमाई केली आहे. तसेच राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जात आहे. हे सर्व नियम पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी लागू करण्यात आले आहेत.