त्यांच्या हातात ED, CBI ते परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करु शकतात – संजय राऊत

, “केंद्र सरकार काहिही करु शकतं त्यांच्या हातात ईडी आणि सिबीयसारख्या संस्था आहेत. त्यामुळे ते परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करु शकतात.” अशी मिश्कील टीका राऊत यांनी केली आहे.

    मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नारायण राणे यांच्याशी बोनवर बातचीत केल्यानंतर राऊत भुवनेश्वरचा दौरा अर्धवट सोडून घाईघाऊने मुंबईत आले. यावेळी त्यांनी विमानतळावरच मीडियाशी संवाद साधला.

    त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राणे म्हणाले की, “केंद्र सरकार काहिही करु शकतं त्यांच्या हातात ईडी आणि सिबीयसारख्या संस्था आहेत. त्यामुळे ते परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करु शकतात.” अशी मिश्कील टीका राऊत यांनी केली आहे.

    महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही, असं विधान नारायण राणे यांनी केलं होतं. त्यावरुनही राऊत यांनी राणेंचा समाचार घेतला. राऊत म्हणाले की, “काय करायचं आणि काय नाही हे ठरवणारे ते कोण? आम्ही आणि मोदी पाहून घेऊ काय करायचं ते. कोण काही बोलत असेल तर त्यावर बोललंच पाहिजे असं नाही. केवळ एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नव्हे. आम्हाला बोलायचंच असेल तर आम्ही नरेंद्र मोदींशी बोलू. अमित शहांशी बोलू. राष्ट्रपतींशी बोलू. आम्ही रिकामे नाही आमच्याकडे कामं आहेत.” असा टोलाही राऊत यांनी लगावला.

    मुख्यमंत्र्यांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारी संदर्भात बोलताना राऊत म्हणाले की, “कुणी काय म्हटलं मला माहीत नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. तोपर्यंत तुम्ही झोपले होते का? तेव्हा ते विधान आक्षेपहार्य वाटलं नव्हतं का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ते विधान का केलं? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला म्हणून मुख्यमंत्र्यांनी ते विधान केलं. भाजपला महाराजांचा अवमान आवडला असेल तर ठिक आहे. आम्हाला नाही चांगलं वाटलं म्हणून आम्ही त्यावर बोललो. चपला घालून महाराजांना कुणी हार घालत नाही. हा आमचा रितीरिवाज आणि परंपरा आहे. महाराजांबद्दलचा आदर आहे.” असं राऊत यांनी म्हटलं आहे.