घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या मुंबई पालिकेच्या प्रस्तावाला केंद्र सरकारचा नकार, धोरणात तसा मुद्दा नसल्याचे दिले स्पष्टीकरण

मुंबई पालिकेने वयोवृद्ध आणि दिव्यांगांसाठी घरोघरी जाऊन लसीकरण(door to door corona vaccination in mumbai) करण्याची परवानगी मागितली होती. केंद्रीय आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे धोरण नसल्याचे सांगून हा प्रस्ताव नाकारला आहे.

    मुंबई: मुंबई पालिकेने केंद्र सरकारकडे घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची परवानगी मागणारा प्रस्ताव सादर केला होता. मात्र केंद्र सरकारने हा प्रस्ताव नाकारला आहे. मुंबई पालिकेने वयोवृद्ध आणि दिव्यांगांसाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची परवानगी मागितली होती. केंद्रीय आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे धोरण नसल्याचे सांगून हा प्रस्ताव नाकारला आहे.

    दरम्यान आता लसीकरण केंद्रांचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे लोकांना कोरोनाच्या लसीसाठी २ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करावा लागणार नाही. घराजवळच लोकांना कोरोनाची लस घेता येणे शक्य होणार आहे.

    मुंबई पालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबईत दिड लाखापेक्षा जास्त लोक आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहेत. काही लोक दिव्यांग आहेत. त्यांना लसीकरणासाठी घराबाहेर जाणे शक्य नाही. त्यामुळे याविषयी केंद्राला पत्र लिहिले होते. वृद्ध आणि दिव्यांगांच्या घरी जाऊन लसीकरण करण्याची परवानगी मागितली होती. मात्र केंद्राने असे धोरण नसल्याचे सांगितले आहे.