मध्य रेल्वेने शनिवारी मध्यरात्री घेण्यात येणारा कल्याण-कसारा दरम्यानचा पॉवर ब्लॉक केला रद्द

शहाड स्थानकावर रोड क्रेनद्वारे पादचारी पुलाचे गर्डर बसविण्यासाठी ०२.०० ते ०४.३० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल.

  मुंबई : मध्य रेल्वने रात्री दिनांक ११.३.२०२१ रोजी प्रप क्रमांक २०२१ /०३/१५ अन्वये जाहीर केलेला कल्याण-कसारा विभागातील दिनांक १३/१४.३.२०२१ च्या मध्यरात्रीचा ट्रॅफिक अँड पॉवर ब्लॉक काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आला आहे. तथापि, शहाड स्थानकावर रोड क्रेनद्वारे पादचारी पुलाचे गर्डर बसविण्यासाठी ०२.०० ते ०४.३० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल.

  या ब्लॉकमुळे,रेल्वे वाहतूक खालीलप्रमाणे असेल.

  दिनांक १४.३.२०२१ रोजी उपनगरी गाड्या रद्द

  • टीएल -१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून ०५.२८ वाजता सुटणारी टिटवाळा लोकल
  • टीएल-२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी टिटवाळाहून ०४.१० वाजता सुटणारी

  टीएल-४ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी टिटवाळाहून ०४.३२ वाजता सुटणारी लोकल ब्लॉक पूर्ण झाल्यानंतर सुटेल.

  ब्लॉक पूर्ण होईपर्यंत मुंबईच्या दिशेने येणाऱ्या विशेष गाड्यांचे नियमन

  • दिनांक १२.३.२०२१ रोजीची 02541 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष टिटवाला येथे थांबविण्यात येईल.
  • दिनांक १२.३.२०२१ रोजीची 02810 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष खडवली येथे थांबविण्यात येईल.

  मुंबईच्या दिशेने येणारी विशेष गाडी रद्द

  अ) दिनांक १३.३.२०२१ रोजीची 01142 आदिलाबाद- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष