central railway

सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने १९ ऑक्टोबरपासून दररोजच्या विशेष उपनगरी सेवांची संख्या ४८१ वरून ७०६ वर करण्याचा निर्णय घेतला आहे.(central railway to run 706 new local from19 october) यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाच्या मंजुरीनुसार मध्य रेल्वे(central railway) सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी ४८१ विशेष उपनगरीय सेवा चालवित आहे. सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने १९ ऑक्टोबरपासून दररोजच्या विशेष उपनगरी सेवांची संख्या ४८१ वरून ७०६ वर करण्याचा निर्णय घेतला आहे.(central railway to run 706 new local from19 october) यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

७०६ उपनगरी सेवांची माहिती – मुख्य मार्ग (मेन लाइन) – ४९९ (धिम्या सेवा ३०९ आणि जलद सेवा १९०), हार्बर लाइन – १८७, ट्रान्सहार्बर लाइन – २०

प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर जाताना आणि विशेष उपनगरी गाड्यांमध्ये प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंग निकषांचे पालन करावे आणि मास्क घालावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.