मध्य रेल्वे करणार २५,०००  पीपीई  कव्हरऑल उत्पादन

मुंबई: मध्य रेल्वेने कोविडसाठी ४८२ कोचचे आयसोलेशन / अलगीकरण वॉर्ड रूपांतरित बनविण्याचे लक्ष्य पूर्ण केल्यावर आता कर्मचारी डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ यांचेसाठी अत्यंत आवश्यक प्रतिबंधक उपकरणे करण्यासाठी तयारी सुरु आहे.

 मुंबई:  मध्य रेल्वेने कोविडसाठी ४८२ कोचचे आयसोलेशन / अलगीकरण वॉर्ड रूपांतरित बनविण्याचे लक्ष्य पूर्ण केल्यावर आता कर्मचारी  डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ यांचेसाठी अत्यंत आवश्यक प्रतिबंधक उपकरणे   करण्यासाठी तयारी सुरु आहे.

भारतीय रेल्वेद्वारे  ठरवण्यात आलेल्या  १.५ लाख पैकी मध्य रेल्वे २५,००० वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) तयार करणारी आहे.  हे वैयक्तिक संरक्षक उपकरणाचे संपूर्ण पोषाख( पीपीई  कव्हरऑल)  डीआरडीओद्वारे मंजूर केलेल्या मानक आणि तपशीलानुसार असणार आहे.
 कच्चा माल शासकीय मान्यताप्राप्त पुरवठादारांकडून घेतला जाणार लसून  प्रत्येक  बनवलेल्या कवरऑलसाठी रेल्वेला जीएसटीसह रूपये ४२२ रुपये  खर्च येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर बाजारात हेच रुपये ८०८.५० उपलब्ध आहे.  मध्य रेल्वेने स्वत: संपूर्णपणे पीपीई बनविण्यामुळे मोठा फायदा होणार आहे.  कारण यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्यापासून संरक्षण मिळनार आहे.
 कोरोना विषाणू विरूद्ध  राष्ट्राच्या लढ्यात भारतीय रेल्वे आघाडीवर आहे.  भारतीय रेल्वेने अलीकडेच आपल्या रेल्वे डब्यांना (कोचेसना) व्हेंटिलेटरसह जीवनदायीनी असलेल्या कोविड-रेडी आयसोलेशन / क्वारंटाईन वॉर्डमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. हे वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे मध्य रेल्वेच्या परळ आणि माटुंगा कार्यशाळेत शिवण्यात येणार आहे. 
 कोविड -१९ पासून बचाव करण्याकरिता परळ रेल्वे कार्यशाळेचे योगदान इतके मोठे आहे.   कोचेसना आयसोलेशन वॉर्डमध्ये रूपांतरित करण्याच्या योगदाना व्यतिरिक्त,  अलीकडेच या कार्यशाळेमध्ये ५० ऑक्सिजन सिलिंडर ट्रॉली तयार करण्यात आल्या आहेत.  या ट्रॉली मध्य रेल्वेच्या रुग्णालयांना पुरविल्या गेल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 १४० वर्ष जुन्या परळ रेल्वे कार्यशाळेला जागतिक युद्धांदरम्यान सशस्त्र दलाला सेवा देण्याचे गौरवशाली वेगळेपण आहे.   आपल्या राष्ट्रात कोविड-१९ विरूद्ध सुरू असलेल्या युद्धाचा सामना करण्यासाठी आता परळ रेल्वे कार्यशाळा  महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात.